पुण्यात सिंहगड कॉलेजची भिंत कोसळली, 6 मजुरांचा मृत्यू

कोंढवा येथील संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात सिंहगड कॉलेजची भिंत कोसळली, 6 मजुरांचा मृत्यू

पुणे : कोंढवा येथील संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगावातील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तर सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे.

जखमींना भारती रूग्णालयात दाखल केले आहे. झाड पडून संरक्षक भिंत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात काल (29 जून) मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 मजुर तर तीन मुलांचा समावेश आहे. कोंढव्यातील तालाब मशीदीजवळील कंपनीसमोर ही दुर्घटना घडली.

Published On - 8:16 am, Tue, 2 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI