पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

| Updated on: Feb 03, 2020 | 9:30 PM

येत्या गुरुवारी (6 फेब्रुवारी) पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार (Water supply remain closed in Pune) आहे

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
Follow us on

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कामे हाती घेतली जाणार (Water supply remain closed in Pune) आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (6 फेब्रुवारी) पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी (7 फेब्रुवारी) उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन यांसह इतर काही विद्युत, पंपिग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत.

पुण्यातील सर्व पेठा, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, कोथरुड, कर्वेनगर, कोंढवा खुर्द, पर्वत, पुणे विद्यापीठ यांसह इतर ठिकाणीही गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारीही पुण्यात उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं (Water supply remain closed in Pune) आहे.