Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

| Updated on: Oct 13, 2020 | 9:30 AM

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे.

Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
Follow us on

मुंबई : हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. यामुळे आज तब्बल 5 राज्यामध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगनासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. (Weather Alert heavy to very heavy rains at Konkan Goa south Madhya Maharashtra and Marathawada)

हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदलामुळे मंगळवारी तेलंगणात मुसळधारते अतिमुसळधार (heavy to very heavy falls) पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागांतही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर वादळात झालं आहे. यामुळे मंगळवारी देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. यावेळी 55-65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर नंतर याचा वेग 75 किमी तासापर्यंत वाढू शकतो. यावेळी समुद्री भागामध्ये 20 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. (Weather Alert heavy to very heavy rains at Konkan Goa south Madhya Maharashtra and Marathawada)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळपर्यंत आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनारपट्टी भागात समुद्राची वादळी परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत मच्छिमारांना समुद्रावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा वादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करण्यासाठी जाऊ नये. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असं हवामान विभाकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या – 

Covid Vaccine Update: कोरोना लस देताच प्रकृती बिघडली, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन कंपनीनं ट्रायल थांबवलं

राज्यासाठी आनंदाची बातमी, हॉटस्पॉट जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली

(Weather Alert heavy to very heavy rains at Konkan Goa south Madhya Maharashtra and Marathawada)