गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?

गडचिरोली : गडचिरोलीत महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी रक्तपात केला आहे. सी-60 पथकाची गाडी आयईडी स्फोट घडवून उडवली. या स्फोटात सी-60 पथकातील 15 जवान आणि खासगी गाडीचा ड्रायव्हर शहीद झाले. गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले. सी 60 तुकडीचे हे […]

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ 'सी-60 फोर्स'चं ट्रेनिंग कसं होतं?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

गडचिरोली : गडचिरोलीत महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी रक्तपात केला आहे. सी-60 पथकाची गाडी आयईडी स्फोट घडवून उडवली. या स्फोटात सी-60 पथकातील 15 जवान आणि खासगी गाडीचा ड्रायव्हर शहीद झाले. गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले. सी 60 तुकडीचे हे सर्व जवान होते. गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला केला.

सी-60 फोर्सकाय आहे?

सर्वसामान्य पोलिसांना ज्याप्रकारे प्रशिक्षण दिले जाते, त्यापेक्षा ‘सी-60’ फोर्समधील जवानांचे प्रशिक्षण पूर्णपणे वेगळे असते. जंगलातील युद्धासाठी किंवा कारवायांसाठी या जवानांना प्रशिक्षण दिले जाते. हैदराबादमधील ग्रे-हाऊंड्स, पूर्वांचलच्या आर्मीची जंगल वॉरफेयर शाळा आणि मानेसरच्या एनएसजी इथे या जवानांना प्रशिक्षण दिले जाते. ‘सी-60’ फोर्समधील कमांडोंकडे शस्त्रही वेगळे असतात.

नक्षलवादी जंगल परिसरातीलच राहणाऱ्या लोकांना भरती करतात. त्यामुळे नक्षलवाद्यांविरोधात लढण्यासाठी तेथील भाषा, रस्ते इत्यादी गोष्टीही माहिती असणारे जवान आपल्याकडे असणं गरजेचं होतं. त्याशिवाय, नक्षलवाद्यांविरोधात लढणं केवळ अशक्यप्राय झालं होतं. त्यातूनच 1990 सालाच्या सुमारास ‘सी-60’ फोर्सची संकल्पना उदयास आली.

नक्षलप्रभावित क्षेत्रातील तरुणांची निवड करुन, 1990 साली ‘सी-60’ फोर्सची पहिली तुकडी तयार करण्यात आली. यात स्थानिक भाषा बोलणारे आणि सर्व रस्ते माहित असणारे तरुण होते. त्यावेळी 60 जणांचा पहिल्या तुकडीत समावेश होता, म्हणून ‘सी-60’ फोर्स असे नाव पडले होते. मात्र, पुढे तुकडीतील जवानांची संख्या वाढली, तरी नाव ‘सी-60’ फोर्सच राहिलं.

‘सी-60’ फोर्सच्या जवानांना खास जंगलातील कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे जंगलातून वजनदार शस्त्र घेऊन किंवा मृतदेह घेऊन फिरणं, तेही अन्न-पाण्याविना, हे या जवानांना नेहमीचंच आहे. ‘सी-60’ फोर्समधील कुठल्याही जवानाला स्वत:चं नाव उघड न करण्याचे बंधन आहे. कारण या जवानांच्या नातेवाईकांवर नक्षलवाद्यांकडून धोका असतो. त्याग आणि धैर्य याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ‘सी-60’ फोर्सचे जवान आहेत.

‘सी-60’ जवानांच्या कुटुंबीयांना कायम नक्षलवाद्यांकडून धोका असतो. अनेक ‘सी-60’ जवानांच्या घरातल्या सदस्यांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. कुणी स्थानिक तरुण या फोर्समध्ये भरती झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना नक्षलवाद्यांकडून त्रास दिला जातो.

‘सी-60 फोर्स’कडून देशातील सगळ्यात मोठं ऑपरेशन

भारताच्या इतिहासातील नक्षलवाद्यांच्या विरोधातील सर्वात मोठं ऑपरेशन गडचिरोलीत झालं होतं. हे ऑपरेशन ‘सी-60 फोर्स’नेच केलं होतं. गडचिरोलीतील राजाराम कोरेपल्ली जंगलात हे ऑपरेशन ‘सी-60’ फोर्सने पार पाडलं होतं. या ऑपरेशनअंतर्गत 37 नक्षलवाद्यांचा एकाचवेळी खात्मा करण्यात आलं होतं. 16 नक्षलवाद्यांचा जागच्या जागी खात्मा, तर उर्वरित 15 जखमींचे मृतदेह नदीत सापडले होते. त्यानंतर राजाराम खानाला परिसरात आणखी 6 नक्षलावाद्यांना ठार करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.