नवऱ्याची चार लग्न, तरीही पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, माहेरच्यांकडून हत्या

सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीच्या कुटुंबियांनी हत्या करण्यात आली (Wife family killed husband in Mumbai)  आहे.

नवऱ्याची चार लग्न, तरीही पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, माहेरच्यांकडून हत्या
| Updated on: Aug 16, 2020 | 10:28 PM

मुंबई : सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीच्या कुटुंबियांकडून हत्या केली आहे. मोहम्मद सुलेमान अब्दुल शेख (40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Wife family killed husband in Mumbai)

मोहम्मद सुलेमान अब्दुल शेख यांनी चार लग्न केली होती. यातील दुसऱ्या क्रमांकाच्या पत्नीच्या चारित्र्यावर तो सतत संशय घेत होता. त्याच्या पत्नीचे तिच्या सख्ख्या भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन शेख तिला वारंवार त्रास देत होता. तिला मारहाण करायचा.

बहिणीचा नवरा तिला त्रास देतो, मारहाण करतो याचा राग मनात धरुन भाऊ रामेश्वर चौधरी, सोमेश्वर चौधरी, बंडू चौधरी, लक्ष्मण उर्फ पोपट चौधरी या चौघांनी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. या चौघांनी मोहम्मद शेख यांच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्यांची हत्या केली.

मोहम्मद सुलेमान हा रे रोडच्या ब्रिक बंदर परिसरात राहायचा. तो गाडी चालवायचा. त्यासोबतच त्याचे दुकान आणि इतर अनेक धंदे होते.

दरम्यान, या हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी दोन तासात चौघांना अटक केली. यानंतर त्यांना भोईवाडा न्यायलयात हजर करण्यात आले. तिथे न्यायाधिशांनी त्या चौघांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी संशयाव्यतिरिक्त इतर काही कारण आहे, का याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.(Wife family killed husband in Mumbai)

संबंधित बातम्या : 

अहमदनगरमध्ये हैदोस, बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने पीडितेच्या मुलीला पेटवलं

जालन्यात 14 वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार, नराधमास जन्मठेपेची शिक्षा