विनामास्क फिरल्यास सोलापुरात 500 तर दिल्लीत 2 हजाराचा दंड, कोणत्या राज्यात दंडाची रक्कम किती ?

| Updated on: Nov 19, 2020 | 7:57 PM

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सोलापूरपासून ते थेट देशाची राजधानी दिल्लीपर्यंत सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

विनामास्क फिरल्यास सोलापुरात 500 तर दिल्लीत 2 हजाराचा दंड, कोणत्या राज्यात दंडाची रक्कम किती ?
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सोलापूरपासून ते थेट देशाची राजधानी दिल्लीपर्यंत सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सोलापुरात विनामास्क फिरताना आढळल्यावर नागरिकांना आता 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. तर, हाच दंड दिल्लीमध्ये 2000 हजार रुपये करण्यात आला आहे. (with respect of corona pandemic different laws in different states)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून व्यक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात आहे. दिल्ली तसेच राज्यातील पुणे, मुंबईसारख्या शहरांत कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाविषय नियम पाळणे तेथील स्थानिक प्रशासनाकडून बंधनकारक करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये विनामास्क फिरल्यानंतर पूर्वी 100 रुपये दंड होता. आता तो वाढवून थेट 500 करण्यात आला आहे. हा आदेश पोलिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला.

सोलापूर शहरात बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. शिवाय विनामास्क फिरणाऱ्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोलापूर स्थानिक प्रशासनाने कडक दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी विनामास्क फिरताना आढळल्यास 100 रुपये दंड आकारण्यात येत होता. आता तो 500 रुपये करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

बिहार, पश्चिम बंगालमध्ये 50 रुपये, झारखंडमध्ये 1 लाख रुपयापर्यंत दंड

देशात वेगवेगळ्या राज्यांत कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन तेथील स्थानिक प्रशासन नियम ठरवत आहे. चेहऱ्यावर मास्क न लावता फिरल्यास वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळा दंड आहे. एनडीए शासित बिहार आणि तृणमूल काँग्रेस शासित पश्चिम बंगालमध्ये विनामास्क फिरल्याने सर्वांत कमी 50 रुपये दंड आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये विनामास्क फिरताना आढळल्यास 5 हजार रुपयांचा दंड आहे. केरळमध्ये हा दंड 2 ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे.

झारखंड सरकारने कोरोनाविषयक नियम अतिशय कडक केले आहेत. नागरिक विनामास्क फिरताना आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारागृह आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद झारखंड सरकारने केली आहे.

केरळमध्ये पुढील एक वर्ष नियम पाळावे लागणार

केरळ सरकारने कोरोनाविषयक नियम पाळण्याविषयी कडक पवित्रा घेतला आहे. नागरिक सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन तसेच विनामास्क फिरताना आढळले तर 10 हजार रुपयांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच दोन वर्षांपर्यंत कारागृहाची शिक्षासुद्धा दिली जाऊ शकते. (with respect of corona pandemic different laws in different states)

संबंधित बातम्या :

Salman Khan | दोन स्टाफ मेंबर्सना आधी कोरोनाची लागण, आता सलमान खानचा अहवाल समोर

दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन