Salman Khan | दोन स्टाफ मेंबर्सना आधी कोरोनाची लागण, आता सलमान खानचा अहवाल समोर

सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे चाहत्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला

Salman Khan | दोन स्टाफ मेंबर्सना आधी कोरोनाची लागण, आता सलमान खानचा अहवाल समोर

मुंबई : दोन स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्यानंतर बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) स्वतःला आयसोलेट केलं होतं. आपल्या लाडक्या भाईजानला कोरोनाचा संसर्ग तर झाला नाही, याची काळजी चाहत्यांना सतावत होती. सलमानसह संपूर्ण खान कुटुंबाने आपली कोव्हिड चाचणी करुन घेतली असून त्याचे अहवाल समोर आले आहेत. (Salman Khan and his family members test negative for COVID19)

सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सलमानच्या ‘खान’दानासह त्याच्या फॅन मंडळींनीही सुटकेचा निश्वास टाकला. विशेष म्हणजे येत्या आठवड्याच्या बिग बॉसच्या (Bigg Boss 14) शूटिंगलाही सलमान हजेरी लावणार आहे.

सलमानच्या ड्रायव्हरसह दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सलमानने तातडीने स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं होतं. सलमान आयसोलेट झाल्याने त्याच्या निर्मात्यांचेही धाबे दणाणले होते. कारण, यावेळी सलमान खानच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत.

सलमान सध्या बिग बॉस-14 या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. सलमानला वीकेंड का वारमध्ये पाहण्याची उत्सुकता बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांप्रमाणे प्रेक्षकांनाही असते. मात्र त्याने स्वतःला आयसोलेट केल्यानंतर बिग बॉसचे निर्माते आणि चाहतेही धक्क्यात होते. सोशल मीडियावर भाईजानच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत होता. अखेर सलमानचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

सलमान खानने याआधीही आपण कोरोना व्हायरसमुळे अत्यंत भयभीत झाल्याचं सांगितलं होतं. ही भीती स्वत:साठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी वाटते, आपल्यासोबत घरात राहणाऱ्या सदस्यांमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकही आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सलमानने सांगितलं होतं. (Salman Khan and his family members test negative for COVID19)

संबंधित बातम्या :

सलमानच्या ड्रायव्हरला कोरोना, भाईजान आयसोलेट

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’ने एजाजची मागणी फेटाळली, घराबाहेर काढण्याऐवजी कविताला केवळ ‘समज’!

(Salman Khan and his family members test negative for COVID19)

Published On - 5:00 pm, Thu, 19 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI