विनामास्क बेशिस्त वर्तन करणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन, लातूर पोलीस अधीक्षकांची कारवाई

लातूर जिल्ह्यातल्या गातेगाव येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

  • महेंद्र जोंधाळे, टीव्ही 9 मराठी, लातूर
  • Published On - 12:00 PM, 5 Nov 2020

लातूर : आतापर्यंत पोलीस विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत होती (Latur Four Police Suspended). मात्र, आता चक्क पोलिसांवरच मास्क न वापरल्याने कारवाई करण्यात आली आहे. लातुरात चार पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या पोलिसांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे (Latur Four Police Suspended).

लातूर जिल्ह्यातल्या गातेगाव येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर मास्क न वापरता पोलीस स्टेशनच्या विश्रामगृहात बेशिस्त वर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अचानक गातेगाव पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी हे चार कर्मचारी बेशिस्त वर्तन करताना आढळले.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे काही दिवसापूर्वीच लातूर इथे रुजू झाले आहेत. जिल्ह्यतल्या अनेक पोलीस स्टेशनला ते सध्या भेटी देत आहेत. याच दरम्यान, त्यांनी गातेगाव पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी विश्रामगृहात चार पोलीस कर्मचारी आणि दोन होमगार्ड हे कर्तव्यात कसूर करताना आढळले.

या पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. कोरोना काळात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तिथे पोलीसच विनामास्क दिसून आले. तसेच, त्यांचं बेशिस्त वर्तन पाहून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या चारही कर्मचाऱ्यांवर निलंबानाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला. तसेच, कायद्यासमोर पोलीस आणि सामान्य नागरिक समान असल्याचंही यातून दिसून आलं.

Latur Four Police Suspended

संबंधित बातम्या :

पुणे : शौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने हल्ला करुन डोळा काढला, शिरुर तालुक्यातील संतापजनक घटना

नाशकात चोरांचा सुळसुळाट, दिवाळीच्या तोंडावर चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंगच्या घटनांत वाढ

झाडावरुन पैसे पाडण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक; पोलिसांनी जादुटोणा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या