महिला पोटदुखीच्या उपचारासाठी गेली, डॉक्टरांनी किडनी काढून घेतली?

सोलापूर : पोटदुखीच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एक महिलेची किडनी काढल्याचा आरोप सोलापुरातील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरवर होतोय. याबाबतची तक्रार संबंधित महिला रुग्ण आणि  स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. घटनेची गंभीर दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने  संपूर्ण प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यामुळे अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि […]

महिला पोटदुखीच्या उपचारासाठी गेली, डॉक्टरांनी किडनी काढून घेतली?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

सोलापूर : पोटदुखीच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एक महिलेची किडनी काढल्याचा आरोप सोलापुरातील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरवर होतोय. याबाबतची तक्रार संबंधित महिला रुग्ण आणि  स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. घटनेची गंभीर दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने  संपूर्ण प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यामुळे अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

सुनिता अरुण इमडे या उपचारासाठी गेल्या होत्या. यांची अवस्था करायला गेले एक आणि झालं एक अशी झालीय. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा गटप्रवर्तक म्हणून काम करणाऱ्या सुनिता इमडे या आईच्या मोतीबिंदू इलाजासाठी जून 2016 मध्ये कुंभारी येथील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे गेल्या होत्या. तिथे त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने डॉ. शितोळे यांच्याकडे दाखल केले असता, सूज आल्याचं सांगत राजीव गांधी आरोग्य योजनेतून उपचार करण्याचं ठरलं.

यानुसार सुनिता इमडे या 16 जून 2016 रोजी अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये अॅडमिट झाल्या. सुनीता यांच्या रक्ताच्या आणि इतर चाचण्या पाहून डॉ. शितोळे यांनी सुनिता यांना किडनीस्टोन झाल्याचं सांगत रुग्णाच्या अपरोक्षपणे अशिक्षित आई आणि भावाला बोलावलं. निकामी झाल्यामुळे किडनी काढावी लागली, अन्यथा मोठा धोका होता अशी भीती आई आणि भावाला घातली. उजव्या बाजूची किडनी काढून घेतल्याचा आरोप सुनिता इमडेंनी केलाय.

अॅडमिट असताना आपण घरातयोग्य  विचारविनियम करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं असतानाही रुग्णाच्या जीवितास धोका होऊ शकतो अशी भीती घालण्यात आली आणि राजीव गांधी जीवनदायी योजनेतून ऑपरेशन होणार असल्याचं सांगण्यात आलं. ऑपरेशन स्वखर्चातून करण्यासाठी कन्सेंट फॉर्मवर सही आणि अंगठा घेतल्याचा सुनिता यांचा आरोप आहे. सुनिता या प्रत्येकवेळी तपासणी  करत असताना डॉक्टरांना किडनी काढू नका अशी विनंती करत होत्या. मात्र डॉक्टर आम्ही आहोत, आम्हाला आमचे काम करू द्या म्हणत जबरदस्तीने 20 जून 2016 रोजी चांगली किडनी काढून घेतल्याचा आरोप सुनिता यांनी केलाय.

सुनिता यांना एकुलता एक मुलगा आहे. किडनी काढून घेतल्यानंतर सुनिताला आता काम करणं अवघड जात आहे. प्रत्येकवेळा त्यांना अस्वस्थ वाटतं. मात्र घराचा गाडा चालवण्यासाठी त्यांच्यासमोर काम केल्याशिवाय पर्याय नाही. याबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडे विचारणा केल्यावर सुनिता यांना यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप आहे. त्यामुळे त्यांनी सनराईज हेल्थ अँड रिसर्च फाऊंडेशनकडे मदतीसाठी विनंती केली. त्यानुसार संस्थेने केलेल्या प्राथमिक तपासणीत किडनी काढून टाकणे गरजेचे नसताना काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचा दावा संघटनेने केलाय.

संघटनेतील तक्रारदार डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,

किडनी काढताना मेफ्रोलॉजिस्टचा सल्ला घेणं महत्त्वाचं होतं, पण सल्ला घेतला नाही.

रिअलआयसोटोप स्कॅन केला नाही.

कन्सेट फॉर्मवर पूर्वकल्पना न देता आणि न सांगता नातेवाईकांची सही घेतली.

ऑपरेशनच्या डिटेल्स उपलब्ध नाहीत, ऑपरेशन कुणी केले याची कल्पना नाही, अस्टिस्ट कुणी केले याची माहिती नाही.

एचपीआर रिपोर्ट आहे, मात्र स्लाईड उपलब्ध नाही.

ब्लड शुगर ,क्रिएटिन सगळे नॉर्मल असताना किडनी का काढण्यात आली?

काढलेली किडनी कुठे गेली?

संबधित रुग्णाच्या तक्रारीवरून आणि रिपोर्टसाचा अभ्यास करून डॉ. महेश नाईकवाडे यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाल आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे किडनी काढून घेतल्याची तक्रार करत संबंधित हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

रुग्णालयाचं म्हणणं काय?

या घटनेबाबत आम्ही अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आज हॉस्पिटलच्या एका विश्वस्तांचं निधन झाल्यामुळे कुणीच उपलब्ध नसल्याचं तिथल्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आलंय.

रुग्णसेवेच्या नावावर छोट्या-मोठया हलगर्जीपणा झाल्याच्या अनेक घटना सोलापुरात घडल्याचं समोर आलंय. रुग्ण डॉक्टरांना देव मानतात. पण पोटदुखीच्या निदानासाठी आलेल्या महिलेची थेट किडनी काढली जात असेल तर ही गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे रुग्ण डॉक्टरांकडे जायलाही घाबरतील.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.