बुलाती है मगर जानेका नहीं, लिफ्ट मागून लुबाडणाऱ्या महिलेची दहशत

कराड तालुक्यातील मसूर, कोपर्डे भागात सध्या एक महिला चोराची दहशत माजली (karad women robbery) आहे.

बुलाती है मगर जानेका नहीं, लिफ्ट मागून लुबाडणाऱ्या महिलेची दहशत
Follow us
| Updated on: Mar 04, 2020 | 4:02 PM

सातारा : कराड तालुक्यातील मसूर, कोपर्डे भागात सध्या एक महिला चोराची दहशत माजली (karad women robbery) आहे. रात्रीच्या वेळी वाहनांना लिफ्ट मागून अडवून लूट मार करण्याचे प्रकार घडत आहेत. यातील एखाद दुसरा प्रकार खरा आहे. पण या घटनेवरुन परिसरात सध्या सोशल मीडियावर वो बुलाती है मगर जाने का नहीं, लिप्ट मांगती है रुकने का नहीं, या गाण्याखाली अफवांचे पेवच मसूर भागात फुटल्याने नागरिकांमध्ये भितीचे (karad women robbery) वातावरण आहे.

कराड तालुक्यातील मसूर, कोपर्डे हा सधन भाग आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामुळे या भागातील रस्त्यांवर सतत गर्दी असते. गेल्या काही दिवसांपूर्वी मसूर परिसरात शेतात गेलेल्या महिलेचा किरकोळ दागिन्यांसाठी चोरट्यांनी खून केला होता. तेव्हापासून लोकांमधे भिती आहे.

गेल्या आठवड्यात सह्याद्री कारखान्याचे कामगार दयानंद सरगडे यांना शिरवडे रस्त्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास एका महिलेने हात केला. एवढ्या रात्रीची एक महिला रस्त्यावर आल्याने सरगडे यांना शंका आली त्यांनी न थांबता गाडीचा वेग वाढवला. त्यामुळे महिलेने आपल्या दुसऱ्या हातात असलेल्या दांडक्याने सरगडे यांच्यावर जोरदार प्रहार केला. हा प्रहार त्यांच्या डोक्यावर होणार होता. मात्र ते वाकल्यामुळे त्यांच्या पाठीवर बसला.

या प्रकाराबरोबरच कोपर्डे गावातील लहान मुलांबाबतही असा प्रकार घडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही मुलंही महिलेनेच अस केल्याचे सांगत आहेत. अशाप्रकारच्या अनेक चर्चा या परिसरात सध्या सुरु आहेत. लोक रात्र-रात्र जागून गस्त घालत आहेत. मात्र अफवाच खूप असल्याच समोर आलं आहे.

पोलिसांनी बंदोबस्तही वाढवलाय आणि असा प्रकार घडल्यास तातडीने पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे कराड तालुक्यात भितीचे वातावरण आहे. शेती पंपासाठी लागणारी थ्री फेज वीज रात्रीच असल्याने शेतकरी रात्रभर जागेच असतात. मात्र गेल्या आठवड्यापासून रात्री शेतात जाण्याच धाडस शेतकरी करत नाहीत. यामुळे या दहशतीचा फटका शेतीलाही बसला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.