मोबाईल चोराला पकडताना ट्रेनखाली येऊन तरुणाचा मृत्यू

| Updated on: Nov 10, 2019 | 9:14 PM

मोबाईल चोराला पकडताना एका मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू (reay road railway station mobile theft)  झाला. ही घटना काल (9 नोव्हेंबर) रे रोड रेल्वे स्टेशन येथे घडली.

मोबाईल चोराला पकडताना ट्रेनखाली येऊन तरुणाचा मृत्यू
Follow us on

मुंबई : मोबाईल चोराला पकडताना एका मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू (reay road railway station mobile theft)  झाला. ही घटना काल (9 नोव्हेंबर) रे रोड रेल्वे स्टेशन येथे घडली. बिलाल आलम शेख असं मृत मुलाचे (reay road railway station mobile theft)  नाव आहे. पोलिसांनी आरोपी आलम अकबरला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

मुंबईची लाईफ लाईन ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकल ट्रेनला गर्दी असते. या गर्दीतही अनेक चोऱ्या होतात. काल दुपारी बिलाल आपल्या दोन बहीणींसोबत हाजी अली दर्गा येथे जात होता. यावेळी ट्रेन रे रोड स्थानक येथे पोहोचली. या दरम्यान अचानक एक आरोपी त्यांच्या डब्यात चढला आणि त्याच्या लहान बहिणीच्या हातात असलेला मोबाईल खेचला आणि ट्रेन सुरु होताच आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला.

आरोपी मोबाईल घेऊन पळताच बिलालने त्याला पकडले. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि आरोपीने प्लाटफॉर्मवर उडी टाकली. पण आरोपीने बिलालला खेचल्यामुळे बिलालसुद्धा खाली पडला. पण तोपर्यंत प्लाटफॉर्म संपला होता. त्यामुळे बिलाल थेट ट्रेनच्या खाली गेला आणि त्याचा मृत्यू झाला. एका वीस हजारच्या मोबाईलमुळे बिलालला आपला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेल्वे पोलिसांनी आरोपी आलमला अटक केली आहे. आरोपी मुंब्य्राचा रहिवासी आहे. आरोपीच्या नावावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यात तो शिक्षा भोगूनही आला आहे. सध्या तो तडीपार असून सुद्धा चोऱ्या करत असल्याचे समोर आलं आहे. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.