तुमची बायको धोका देतेय का? हे बदल दिसल्यास सावध व्हा, नाहीतर नंतर रडाल

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची शक्यता असल्यास काही लक्षणे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. या लक्षणांवरच निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराशी संवाद साधणे गरजेचे आहे.

| Updated on: Jul 05, 2025 | 10:56 AM
1 / 12
पती-पत्नीचे नाते हे विश्वासावर आधारित असते. पण जेव्हा या नात्यात फसवणूक होते, तेव्हा तो एक प्रकराचा गुन्हा असतो. पती किंवा पत्नी यांच्यातील एखादी व्यक्ती नात्यात समाधानी नसते किंवा जोडीदाराकडून तिच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नसतील, तर ती तेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ जाऊ लागते.

2 / 12
अनेकदा पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधावर बोलले जाते. पण विवाहबाह्य संबंध केवळ पुरुषच ठेवतात असे नाही, तर अनेक महिलाचेही विवाहबाह्य संबंध असतात.  एक अभ्यासानुसार विवाहबाह्य संबंधांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा कमी असली तरी हा प्रकार धक्कादायक असतो.

3 / 12
तुमची पत्नी तुमचा विश्वासघात करत नाहीये ना, हे तपासण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. हे बदल जेव्हा दिसतात, तेव्हा महिला त्यांच्या जोडीदारापासून काहीतरी लपवत असतात, असे मानले जाते.

4 / 12
जर तुमच्या पत्नीचे इतर कोणासोबत अफेअर सुरु आहे आणि जर तुम्हाला तिला रंगेहाथ पकडायचे असेल तर मग तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात.

5 / 12
पती-पत्नीचे नाते छोट्या-छोट्या गोष्टीतूनच घट्ट होते. सकाळी चहा बनवणे, कामावर जाण्यापूर्वी 'गुडबाय किस' देणे, कौतुक करणे, मिठी मारणे या आनंदी नात्याच्या गुरुकिल्ली आहेत. पण, जेव्हा तुमची पत्नी अचानक या गोष्टी करणे थांबवते, तेव्हा तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आल्याचे लक्षण असू शकते. तसेच ती तुमच्यासोबत या नात्यात आनंदी नाही, असाही या बदलाचा आणखी एक अर्थही काढला जातो.

6 / 12
जर तुमची पत्नी अचानक तिच्या मोबाईल किंवा लॅपटॉपसारख्या गॅजेट्सबद्दल अधिक गोपनीयता बाळगू लागली तर ९९ टक्के शक्यता आहे की ती तुम्हाला फसवत आहे. याशिवाय एखादा कॉल आल्यावर ती एकटी बसणं, कोणालाही फोन देणे टाळणे किंवा लॅपटॉप/टॅबलेटची ब्राउझर हिस्ट्री डिलीट करणे ही देखील विवाहबाह्य संबंधांची लक्षणे आहेत.

7 / 12
पती-पत्नी असल्याचा अर्थ असा नाही की सर्व पासवर्ड शेअर केलेच पाहिजेत, पण जोडीदारासोबत शेअर करण्यात कोणतीही अडचण नसावी. यामुळे तुमचे नाते अजून बहरते.

8 / 12
विशेषतः, पत्नींना वाटते की त्यांच्या पतीने त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. पण, जर तुमची पत्नी तुमच्यासोबत कुठेही जाणे टाळत असेल किंवा 'तुम्हाला कमी वेळ मिळतोय' अशी तक्रार करणं तिने थांबवले असेल, तुम्ही उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याला तिला काही हरकत नसेल, तर काळजी घ्या. कारण यामुळे तिचे दुसऱ्या पुरुषाशी अफेअर आहे आणि त्याचा परिणामही दिसत आहे, असे बोललं जाते.

9 / 12
जर तुम्हाला तुमची पत्नी सतत फोनवर बोलताना किंवा मेसेज करताना दिसत असेल, तर सावध व्हा. कारण यामुळे ती दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक साधत आहे, असे म्हटले जाते यासोबतच तिच्या मनःस्थितीकडे लक्ष द्या. जर ती कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय खूप आनंदी किंवा अचानक दुःखी दिसत असेल, तर तिच्या दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर असल्याची शक्यता वाढते.

10 / 12
छोट्या-छोट्या कामांसाठी घराबाहेर पडण्याचे निमित्त वाढत असेल किंवा तुमची पत्नी कामाच्या नावाखाली जास्त काळ घराबाहेर राहायला लागली असेल, तर ते तुमच्यासाठी चांगले लक्षण नाही. कदाचित तिला तिच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी हे सगळे बहाणे करावे लागत असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

11 / 12
तुमची पत्नी आता लैंगिक संबंधांत रस दाखवत नसेल किंवा नेहमी ते टाळण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे तिचे बाहेर अफेअर असल्याचे सर्वात मोठे लक्षण असू शकते. अर्थात, यामागे अन्य शारीरिक किंवा मानसिक कारणेही असू शकतात. पण जर तुमच्या पत्नीसोबतचे तुमचे लैंगिक जीवन पूर्वी चांगले होते आणि आता त्यात अचानक बदल झाला असेल, तर याकडे गांभीर्याने लक्ष द्या.

12 / 12
या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. वैयक्तिक नात्यांमधील गुंतागुंत अनेक कारणांमुळे असू शकते. कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी आपल्या जोडीदाराशी थेट आणि मोकळेपणाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. केवळ या लक्षणांवर आधारित कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका.