काँग्रेसमध्ये खळबळ! एकनाथ शिंदेंनी बडा नेता फोडला, थेट पक्ष प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार
Pune Election : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेची ताकद वाढली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बैठकांना वेग आला आहे, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींनाही सुरुवात झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे पक्षांतरालाही वेग आला आहे. अनेक नेते आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेची ताकद वाढली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारा हा नेता कोण आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्याचे माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश
आगामी पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. उल्हास बागुल यांच्यासह बागुल कुटुंबीय आणि पुणे महापालिकेतले माजी लोकप्रतिनिधींनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिंदेंची ताकद आणखी मजबूत झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पक्षात स्वागत
या पक्ष प्रवेशानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘पुणे शहरातील उपमहापौर उल्हास बागुल यांनी गेली 30 वर्ष अनेक पद भूषवली आहेत, त्यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कामांची पद्धत पहिली, नगरविकास मंत्री म्हणून काम पाहिले. स्लम फ्री पुणे आणि स्लम फ्री महाराष्ट्र करणे हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आबा बागुल यांचा मोलाचा सहकार्य लाभले.’
📍 ठाणे |
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व #पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती सभापती आबा बागुल यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा… pic.twitter.com/4tDuZt8ZqB
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 20, 2025
पुण्याच्या विकासासाठी मी बागुल यांच्या पाठीशी – शिंदे
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘बागुल साहेब तुम्ही कार्यकर्त्यांच्या पक्षात आला आहेत, इथे कोणी मालक नाही कोणी नोकर नाही. तुमचे जे ध्येय आहे पुण्याचा विकास, त्यामध्ये यश मिळेल, मी आपल्या पाठीशी उभा आहे. काँग्रेस विधानसभेच्या धक्क्यातून अजून सावरलेली नाही. आता अजून एक मोठा धक्का मिळाला आहे.’ यावेळी पुणे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे, ठामपा माजी नगरसेवक राजेश मोरे, ठामपा माजी नगरसेवक संजय सोनार तसेच पुण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
