2 लाख भरले अन् महिलेने सरकारी बँकेतली नोकरी सोडली, चार भिंतीच्या आत काय घडलं? उचललं मोठं पाऊल

सरकारी नोकरी लागली की आता आयुष्य सेट आहे.. असा विचार अनेक जण करतात. पण एका महिलेने तब्बल 2 लाख रुपये भरुन सरकारी बँकेतली नोकरी सोडली. तर महिने असं पाऊल का उचललं ते जाणून घ्या...

2 लाख भरले अन् महिलेने सरकारी बँकेतली नोकरी सोडली, चार भिंतीच्या आत काय घडलं? उचललं मोठं पाऊल
| Updated on: Oct 02, 2026 | 12:52 PM

नोकरी मिळवण्यासाठी तरुण अनेक प्रयत्न करत असतात. पण कायम एकच वाक्य कानावर येतं आणि ते म्हणजे ‘सरकारी नोकऱ्या आता राहिल्यात तरी कुठे?’ अशात एका महिलेने सरकारी बँकेतली नोकरी सोडली आहे. महिले तब्बल 2 लाख रुपये भरुन सरकारी बँकेतली नोकरी सोडली आहे. असं म्हणतात की, बँकेतली नोकरी सर्वात चांगली नोकरी… सुरक्षित आणि चांगल्या पगार असल्याने सरकारी बँकेत काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण 31 वर्षीय मधुरिमा हिने सरकारी बँकेतली नोकरी सोडली आहे. नोकरी सोडावी लागली याचं कारण देखील मधुरिमा हिने सांगितलं आहे.

मधुरिमा हिने जवळपास 2 वर्ष IBPS परीक्षेची तयारी केली. त्यानंतर तिला बँकेत नोकरी मिळाली. बँकेत नोकरी करत असताना महिलेला 70 हजार रुपये महिन्याला वेतन मिळत होतं, पण कामाचे वाढलेले तास, न मिळणारी सुट्टी आणि काम दरम्यान न मिळणारा ब्रेक… या अडचणी सतावत असल्याने मधुरिमा हिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडण्यासाठी महिलेला 2 लाख रुपये बॉन्ड पेनल्टी भरावी लागली.

Loading...

रोज 12 तास कामचा दावा…

मधुरिमा हिने सांगितल्यानुसार, ती बँकेत कायम तणावाखाली असायची. बँकेची वेळ सकाळची 8.30 असायची. तर रात्री 10.30 पर्यंत बँकेत काम सुरु असायचं. रविवारी देखील काम करावं लगायचं. यामध्ये मधुरिमा प्रचंड थकायच्या. आपला अनुभव सांगताना त्यी म्हणाली की, कामावरून परतल्यावर ती रोज रडायची. महिलेच्या म्हणण्यानुसार, रजेचे अर्ज अनेकदा मंजूर केले जात नसत.

वॉशरुमला देखील जाता येत नव्हतं…

मधुरिमा हिने सांगितले की, कॅशिअरची जबाबदारी पार पाडत असताना तिला दीर्घकाळ कॅश काउंटरवर बसावं लाहायचं. ग्राहकांचे काम सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुरू होऊन दुपारपर्यंत सतत चालू राहायचं. महिलेचा दावा आहे की, अनेक वेळा त्यांना कित्येक तास ब्रेक मिळत नसे. तसेच कामादरम्यान बरीच वेळ वॉशरूमलाही जाता येत नव्हतं. तिने सांगितलं की, दीर्घकाळ ब्रेक न मिळाल्यामुळे त्यांना UTI (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) ची समस्या उद्भवली.

नोकरीसोबत अतिरिक्त टार्गेट

मधुरिमा यांच्या मते, कॅश काउंटरच्या जबाबदारीशिवाय त्यांना नवीन ग्राहक जोडणे आणि खाती उघडणे यांसारखी अतिरिक्त कामंही दिली जात होती. त्यांनी सांगितलं की, अनेकदा कॅश काउंटर बंद केल्यानंतर त्यांना बाहेर जाऊन लोकांशी संपर्क साधण्यास सांगितलं जात असे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या गावात त्यांची पोस्टिंग होती, तिथे त्यांना कन्नड भाषा येत नव्हती. अशा परिस्थितीत ग्राहकांशी संपर्क साधणं त्यांना आणखी कठीण जात होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us