
नवरा-बायकोचे नाते हे अतिशय घट्ट असते. विश्वास, प्रेम आणि समजतीच्या आधावार हे नाते उभे असते. नवरा बायको सतत एकमेकांची काळजी घेत असतात. कधीच एकमेकाला हर्ट होईल अशा गोष्टी ते करत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यातील हे नाते फार खास असते. पण कधीकधी काही गोष्टींमुळे हे नाते कमकुवत होऊ लागते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांची काळजी घेणे गरजेचे असते. नुकताच रिलेशनशीप कोचने बायकांना एक सल्ला दिला आहे. तिने या चार गोष्टी चुकूनही पतीला सांगू नये असे म्हटले आहे.
नवऱ्याची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना
आपल्या नवऱ्याची कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करणे टाळावे. तुलना आपल्या भावाशी असो, वडिलांशी असो किंवा मित्राशी असो, नवऱ्याची अशा प्रकारे कधीही कोणाशीही तुलना (Compare) करू नये. यामुळे नवरा दुखावला जाऊ शकतो. त्याच्या मनाला ठेच पोहोचू शकते आणि त्याचा आत्मविश्वासही कमी होण्याची दाट शक्यता असते.
पती किंवा त्याच्या कुटुंबाचा अपमान करणे
तुम्हाला मनातील काही सांगायचे असेल किंवा तक्रार करायची असेल तर त्यात पती किंवा पतीच्या कुटुंबाचा अपमान करू नका. हे काम तुम्ही अपमान न करताही करू शकता. प्रयत्न करा की सन्मानाने आपली बाजू मांडता येईल.
त्यांच्या मेहनतीला नकार देणे
पती तुमच्यासाठी, कुटुंबासाठी मेहनत करतो आणि अशा वेळी बायकोनेच पतीची मेहनत नाकारली तर तो खचून जातो. आपल्या पतीची मेहनत नाकारली तरी त्याच्या कष्टाची जाणीव ठेवा. घरातील वातावरण असे ठेवा की तो स्वतःला घरात आल्यानंतर आनंदी ठेवेल आणि स्वतःवर दबाव टाकणार नाही. खरे वागेल.
बेडरूमला तक्रार क्षेत्र बनवू नका
अनेकदा बायको पती आणि आपल्या जवळीकीच्या क्षणांमध्ये (Intimate Moments) तक्रारींचा पिटारा उघडते. असे करू नका. तक्रारींसाठी वेगळा वेळ निवडा. जर तुम्ही जवळीकीच्या क्षणांमध्येही तक्रार करत राहिलात तर हे क्षणही जड वाटू लागतील. त्यामुळे महिलांनी चुकूनही या वेळेत तक्रारी करु नयेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)