Beauty Tips: रोज चेहऱ्यावर लावा ‘या’ 4 पांढऱ्या गोष्टी, तुमची त्वचा होईल तजेलदार

मुरुम आणि डागांमुळे संपूर्ण चेहरा खराब दिसू लागतो. जर तुम्ही यापासून मुक्त होण्यासाठी अनेक प्रोडक्ट वापरून कंटाळला असाल, तर या लेखात आम्ही तुम्हाला अशा 4 पांढऱ्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या त्वचेची ही समस्या दूर होईल आणि तुमचा चेहरा चमकदार दिसेल.

Beauty Tips: रोज चेहऱ्यावर लावा या 4 पांढऱ्या गोष्टी, तुमची त्वचा होईल तजेलदार
Beauty Tips
Image Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Jun 02, 2025 | 11:50 PM

बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येणे ही एक अतिशय सामान्य समस्या बनली आहे. तसेच या समस्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय करून मुरूम आणि पुरळ सहज बरे होऊ शकतात, परंतु काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुमांचे डाग तसेच राहतात. याशिवाय, पिग्मेंटेशनमुळे चेहरा खूप खराब दिसतो. त्यात पिग्मेंटेशनची ही समस्या बहुतेकदा महिलांमध्ये विशिष्ट वयानंतर किंवा गर्भधारणेनंतर दिसून येते. खरं तर कधीकधी हार्मोनल बदल देखील यामागे कारण असतात. डाग आणि मुरुमांच्या डागांपासुन सुटका मिळवण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

क्रिस्टल क्लियर कोणाला आवडत नाही? यासाठी बाजारात महागडे प्रोडक्ट उपलब्ध आहेत, तर घरी बनवलेल्या नैसर्गिक गोष्टी देखील तुमच्या त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत आणि हे उपाय देखील आपल्या बजेटमध्ये असतात. तर या लेखात आपण जाणून घेऊया की पांढऱ्या रंगाच्या कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला चमकदार बनवतील आणि सुरकुत्या आणि डागांपासून मुक्तता मिळेल…

दूध आणि मीठ लावणे

स्किन केअरमध्ये तुम्ही दूध आणि मीठ समाविष्ट करू शकता. यासाठी कच्चे दूध घ्या आणि त्यात मीठ टाकून कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. तुम्ही हे नियमितपणे वापरू शकता. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि मृत त्वचा देखील स्वच्छ होते. दुध आणि मीठ मुरुमे आणि डाग कमी करण्यास खूप उपयुक्त आहे आणि त्वचेला चमक देते. तसेच दुधामुळे त्वचा कोरडी होत नाही.

नारळ तेल आणि तुरटी

त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी नारळाच्या तेलात तुरटी मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. तुम्ही हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर किंवा फक्त ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी लावू शकता. यामुळे तुम्हाला हळूहळू त्वचा स्वच्छ होते . 8 दिवसांत तुम्हाला चांगला फरक जाणवेल. मात्र हे लक्षात ठेवा की जर त्वचा संवेदनशील असेल तर हे मिश्रण लावू नका. याशिवाय प्रथम पॅच टेस्ट करा.

हाताचा कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणाही जाईल निघून

चेहऱ्यासोबतच हात आणि पायांचे सौंदर्यही महत्त्वाचे असते. तर आपल्यापैकी अनेकांच्या हाताचे कोपर आणि गुडघा खुप काळे झालेले असतात त्यामुळे यापासून मुक्ती मिळविण्यासाठी तुम्ही मीठ आणि दूध यांचे एकत्र मिश्रण करून लावू शकता किंवा मिठाऐवजी बेकिंग सोडा देखील वापरू शकता. याशिवाय, बेकिंग सोडा, गुलाबजल आणि तुरटी यांचे मिश्रण देखील कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यास मदत करतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)