पावसाळ्यात बनारसपासून फक्त 2 तासांच्या अंतरावर आहेत ‘हे’ सुंदर धबधबे, एकदा नक्की भेट द्या
बनारसला पोहोचणे हे लोकं भाग्याची गोष्ट मानतात, कारण ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप खास ठिकाण आहे. जर तुम्ही बनारसला जाण्याचा प्लॅन करत असाल आणि निसर्गाने भरलेल्या सुंदर ठिकाणांनाही भेट देऊ इच्छित असाल, तर येथून दीड ते दोन तासांच्या अंतरावर काही धबधबे आहेत ज्यांना भेट देता येते. चला तर मग या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात...

बनारस हे एक असे ठिकाण आहे जिथे भारताच्या कान्याकोपऱ्यातुन भगवान विश्वनाथांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासोबतच येथील गंगा नदीच्या काठावर शांतपणे बसून वेळ घालवतात. तर येथे बहुतेक लोकं आध्यात्मिक वातावरणात येत असतात. तर बनारस हे असे ठिकाणं जेथे अनेक धार्मिक स्थळे आहे या स्थळांना भेट देण्यासाठी देखील लोकं येत असतात. तसेच बनारसचा स्पेशल विड्याचा पान आणि स्थानिक पदार्थांची चव चाखण्यासाठी परदेशी लोकं तिथे येत असतात. भगवान शकंराचे हे शहर इतके खास आहे की ते शब्दात वर्णन करता येत नाही. तर या ठिकाणी फक्त 50 ते 60 किलोमीटर अंतरावर काही अतिशय सुंदर धबधबे आहेत. जे भेट दिल्याने फिरण्याचा एक उत्तम अनुभव तुमच्या लक्षात राहील. बनारसमध्ये एक किंवा दोन दिवस राहिल्यानंतर तुम्ही जवळच्या या धबधब्यांपैकी एकाला भेट देऊ शकता.
प्रत्येकालाच आपल्या बॅगा पॅक करून नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते, परंतु बऱ्याचदा योग्य बजेट नसल्याने लोकं जाऊ शकत नाहीत. सध्या आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे सुंदर धबधबे आहेत आणि तुम्हाला जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. बनारसला फिरायला जाण्याच्या बजेटमध्ये तुम्ही ही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. चला जाणून घेऊयात या ठिकाणांबद्दल.
लखानिया दारी
जर तुम्ही बनारसला जात असाल तर तुम्ही लखनिया दारी धबधबा पाहू शकता जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये आहे आणि बनारसपासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण पिकनिकसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. 150 मीटर उंचीवरून पडणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य खूप सुंदर दिसते.
सिद्धनाथ दारी
सिद्धनाथ दरी धबधबा बनारसपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला दीड तास प्रवास करावा लागेल. हा धबधबा मिर्झापूर जिल्ह्यातील चुनारजवळ आहे.
टांडा धबधबा
तुम्ही जर बनारसला जात असाल तर तुम्ही तांडा धबधबा पाहू शकता. हे नैसर्गिक सौंदर्याने भरलेले ठिकाण आहे. हा धबधबा मिर्झापूर जिल्ह्यातही येतो, परंतु बनारसपासून त्याचे अंतर थोडे जास्त आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला 70 किलोमीटर अंतर कापावे लागेल.
देवदरी-राजदरी धबधबा
जर तुम्ही बनारसला जात असाल तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये देवदरी-राजदरी धबधब्याचा समावेश नक्की करा. हे ठिकाण बनारसपासून 65 किमी अंतरावर आहे आणि पोहोचण्यासाठी सुमारे अडीच तास लागतात. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्यात येते आणि पर्यटकांसाठी एक्सप्लोर करण्यासाठी हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. बनारसहून येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला दीड तास लागतो.
लतीफ शाह धबधबा
हा धबधबा चांदौली येथे देखील आहे आणि तुम्ही देवदरी-राजदरी धबधब्यासह तो पाहू शकता. त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे, हे येथील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण लतीफ शाह धबधबा किंवा लतीफ शाह धरण म्हणून ओळखले जाते, खरं तर ते कर्मनाशा नदीवर बांधलेले धरण आहे.