
वातावरणातील अचानक बदलामुळे काही भागांमध्ये उन्हाच्या झळा बसु लागल्या आहेत. तर काही भागात सकाळी वातावरणात थंडावा तर दुपारी गरम वातावरण असते. त्यात हवामान खात्यानुसार काही दिवसांमध्ये कडक उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यास सुरूवात झाली आहे. तर अनेक लोकं ही घरातील कुलर व पंखा साफ करण्यापासून ते नवीन एसी खरेदी करू लागले आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा नवीन एसी घेण्याचा प्लॅन करत असाल तर एलजी सारख्या कंपन्या काही एसींवर बंपर ऑफर देत आहेत, चला तर मग जाणून घेऊयात काही उत्तम एसी बद्दल…
एलजी ही देशातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह कंपन्यांपैकी एक आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एलजी कंपनी त्यांच्या एसीवर 50 % टक्क्यांहून अधिक सूट देत आहे. एलजीचा 5 टन 3 स्टार ड्युअल इन्व्हर्टर स्प्लिट या एसींवर ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवर 52 % टक्के सवलतीसह 37,690 रुपयांना उपलब्ध आहे.
व्होल्टास कंपनीच्या एअर कंडिशनरवर देखील बंपर सूट उपलब्ध आहे. कंपनी 1.4 टन 3 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसीवर 54 % टक्के बंपर डिस्काउंट देत आहे. तुम्ही हा एसी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर तुम्हाला 54 % टक्के सवलतीत 32,990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
कमी बचत असलेल्यांसाठी MarQ कंपनीचा एसी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर MarQ च्या 0.75 टन 3 स्टार इन्व्हर्टर 4-इन-1 कन्व्हर्टेबल व्हाईट कलर एसीवर 57 % टक्के बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही हा एसी वेबसाइटवरून 19,990रुपयांना खरेदी करू शकता. यातच ग्राहकांना कंपनी ईएमआय सुविधा देखील देत आहे. दरमहा 6,664 रुपये देऊनही एसी खरेदी करता येणार आहे.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगला एसी घ्यायचा असेल तर IFB एसी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कारण कंपनी त्यांच्या या एसीवर 44% टक्के सूट देत आहे. तुम्हाला फ्लिपकार्टवर IFB चा 1.5 टन असलेला 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी 34,490 रुपयांना खरेदी करता येणार आहे.