बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितले केस गळती रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग

खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलत्या हवामानामुळे आपल्या केसांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. अशातच घरगुती उपाय केले तर केसांच्या समस्या काही प्रमाणात रोखता येते. यासाठी आजच्या लेखात आपण बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने केस गळती रोखण्यासाठी सांगितलेल्या घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत...

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितले केस गळती रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग
Actress bhagyashree makes oil for control hair fall
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 01, 2025 | 1:18 PM

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत सौंदर्य आणि जीवनशैलीच्या टिप्स आणि घरगुती उपाय नेहमीच शेअर करत असते. अशातच यावेळीही अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अंकाऊट वरून तिच्या चाहत्यांसाठी केस गळती नियंत्रित करण्याचा एक उत्तम मार्ग सांगितला आहे.

केस गळणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच अनहेल्दी खाण्याच्या सवयीमुळे अनेकांचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतात. अशातच पावसाळा सुरू असल्याने या दिवसांमध्ये दमट वातावरणामुळे केसांची स्थिती आणखीन बिकट होते. ज्यामुळे केस अधिकच गळू लागतात. तर तुम्हालाही केस गळतीपासून मुक्तता मिळवायची असेल आणि केमिकल प्रोडक्ट टाळायची असतील तर तुम्ही भाग्यश्रीने सांगितलेला हा घरगुती उपाय वापरून पाहू शकता. केस गळती कशी नियंत्रित करता येईल ते जाणून घेऊया.

केस गळती रोखण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्रीने तयार केले हे घरगुती तेल

भाग्यश्रीने केस गळती रोखण्यासाठी एक तेल बनवले आहे, ज्यामध्ये तिने नैसर्गिक घटकांचा वापर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे तेल कसे बनवायचे?

यासाठी एक पॅन घ्या आणि त्यात नारळाचे तेल टाका. त्यानंतर, मेथीचे दाणे, एक वाटी कढीपत्ता आणि 5 जास्वंदीचे फुलं यामध्ये टाका. आता हे मिश्रण तेलात चांगले एकजीव होऊ द्या. त्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर, हे तेल एका बाटलीत भरा आणि त्यात कांद्याचा रस मिक्स करा. त्यानंतर हे तेल 1 दिवस उन्हात ठेवा आणि नंतर आठवड्यातून एकदा नियमितपणे केसांवर वापरा. काही दिवसांत तुम्हाला या घरगुती तेलाचा चांगला परिणाम दिसू लागेल.


केसांना हे तेल कसे फायदेशीर ठरते?

या तेलात मेथी, कढीपत्ता आणि जास्वंद फुले, नारळाचे तेल आणि कांद्याचा रस वापरला आहे. हे चारही पदार्थ केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. मेथी केसांची मुळे मजबूत करते, तर स्कॅल्प स्वच्छ करते आणि हे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. कढीपत्ता केसांना वेळेपूर्वी पांढरे होण्यापासून रोखते. जास्वंद केस जलद वाढवते आणि त्यांना रेशमी, गुळगुळीत बनवते. याशिवाय कांद्याचा रस केसांना मजबूत करतो आणि त्यांना जाड करतो. त्यासोबतच तुमच्या डोक्यातील कोंडाही कमी होते आणि रक्ताभिसरण वाढविण्यास देखील मदत करते. नारळाचे तेल केसांना चमकदार आणि फ्रिजीनेस पासून फ्रि ठेवते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)