AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपरपावर अमेरिकेला नाही जमलं, आता एक छोटासा देश ज्याला झिडकारलं, तोच आज सौदी, कतर, UAE, बहरीनसाठी बनला रक्षक

इराण विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात अमेरिका अनेक आघाड्यांवर अपयशी आहे. पण त्यांचं सर्वात मोठ अपयश म्हणजे आखातातील आपले मित्र देश सौदी अरेबिया, कतर, बहरीन, ओमान, UAE यांचा बचाव करता न येणं. आता एक छोटसा देश या आखाती देशांसाठी संकटमोचक बनलाय.

सुपरपावर अमेरिकेला नाही जमलं, आता एक छोटासा देश ज्याला झिडकारलं, तोच आज सौदी, कतर, UAE, बहरीनसाठी बनला रक्षक
Donald Trump
| Updated on: Mar 18, 2026 | 9:23 AM
Share

मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धात अमेरिकेचे इराणवर घातक बॉम्ब हल्ले सुरु आहेत. त्यात इराणचं मोठं नुकसान होतय हे मान्य. पण म्हणून अमेरिकेने इराणच पूर्णपणे कंबरड मोडलेलं नाही. अमेरिकेचा जो उद्देश होता तो साध्य झालेला नाही. उलट रणनितीक दृष्टीने अमेरिकेची पिछेहाटच झालेली आहे. कारण इराणकडून आखाती देशांवर हल्ले सुरु आहेत. इराण सलग इतके दिवस अशा प्रकारचे हल्ले करेल याची अमेरिकेला कल्पना नव्हती. त्याशिवाय स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणने बंद केलय. हा अमेरिकेला रणनितीक आघाडीवर तसा झटकाच आहे. अमेरिकेचं सर्वात मोठ अपयश म्हणजे या युद्धात त्यांना आपल्या आखाती मित्र देशांचा बचाव करता येत नाहीय. तिथल्या तेल रिफायनरीज, विमानतळांवर हल्ले सुरु आहेत.

आता एक छोटासा देश या आखाती देशांच्या मदतीला धावून आलाय. महत्वाचं म्हणजे युद्ध सुरु होण्याआधी या देशाने अमेरिकेलाही मदतीचा प्रस्ताव दिला होता. पण हे काय मदत करणार, या गैरसमजातून अमेरिकेने तो प्रस्ताव धुडकावला. अमेरिकेला आता त्याची किंमत मोजावी लागतेय. या युद्धात इराणसाठी सर्वात घातक आणि प्रभावी अस्त्र ठरलय ते शाहेद ड्रोन. या कमी खर्चिक पर्यायातून इराण आखाती देश आणि अमेरिकेन सैन्य तळांवर हल्ले करतोय. इराणी हल्ल्याची मार झेलणाऱ्या मिडल ईस्टमधील आखाती देशांच्या मदतीसाठी आता युक्रेन पुढे आला आहे.

हे लष्करी अधिकारी आखाती देशांमध्ये ठाण मांडून

युक्रेनचे 200 पेक्षा जास्त लष्करी एक्सपर्ट्स आखाती देशांमध्ये ठाण मांडून आहेत. ते आखाती देशाच्या लष्करांना इराणी ड्रोन हल्ल्यापासून कसा बचाव करायचा? त्यांचे ड्रोन हल्ले कसे परतवून लावायचे? त्याचं प्रशिक्षण देत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी ही माहिती दिलीय. इंग्लंडच्या संसदेत बोलताना मंगळवारी झेलेंस्की यांनी ही माहिती दिली. 201 ड्रोन विरोधी एक्सपर्ट आखाती देशांमध्ये आहेत आणि अजून 34 रवाना होणार आहेत असं त्यांनी सांगितलं.

अजूनही हे युद्ध सुरु आहे

आमचे लष्करी अधिकारी शाहेद ड्रोन हल्ल्यापासून कसा बचाव करायचा यामध्ये एक्सपर्ट आहेत असं झेलेंस्की म्हणाले. रशियाने युक्रेन विरोधात 2022 साली युद्ध सुरु केलं. अजूनही हे युद्ध सुरु आहे. रशिया या युद्धात इराणी बनावटीच्या कामीकाझे ड्रोन्सचा वापर करत आहे. इराण आता याच ड्रोन्सनी आखाती देश आणि अमेरिकन तळांवर हल्ले करत आहे. त्यामुळे शाहेद ड्रोन्सना कसं संपवायचं, याचा दीर्घ अनुभव युक्रेनकडे आहे. आपल्या याच अनुभवाने ते आता आखाती देशांना मार्गदर्शन करत आहेत.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...