AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ali Larijani Death : इस्रायलने थेट इराणच्या सेनापतीलाच उडवलं, लारीजानी त्यावेळी कोणाच्या घरात होते? इराणसाठी हा सर्वात मोठा झटका का आहे?

Ali Larijani Death : इराण विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात इस्रायलने काल एक मोठी रणनितीक कामगिरी केली. त्यांनी थेट इराणच्या सेनापतीलाच उडवलं. यु्द्धात इराण वरचढ होत असतानाच केलेल्या या स्पेशल ऑपरेशमुळे युद्धाचं पारड पुन्हा अमेरिका-इस्रायलच्या बाजूने वळू शकतं, कसं ते समजून घ्या.

Ali Larijani Death : इस्रायलने थेट इराणच्या सेनापतीलाच उडवलं, लारीजानी त्यावेळी कोणाच्या घरात होते? इराणसाठी हा सर्वात मोठा झटका का आहे?
Ali Larijani Death
| Updated on: Mar 18, 2026 | 8:41 AM
Share

इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात काल मृत्यू झाला. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. इराणने सुरुवातीला हे वृत्त फेटाळलं होतं. पण रात्री त्यांनी अली लारीजानी यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं. लारीजानी यांनी अयातुल्ला अली खामेनेई यांचे सल्लागार म्हणून सुद्धा काम केलं आहे. फार्स न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, लारीजानी यांच्या मुलीच तेहरानच्या हद्दीजवळच घर आहे. ते आपल्या मुलीला भेटायला गेले होते. त्याचवेळी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 67 वर्षी लारीजानी यांचा मृत्यू झाला. अली लारीजानी यांना इस्रायल-अमेरिका आपलं कट्टर शत्रु मानते. त्यांचा मृत्यू हा इराणसाठी मोठा धक्का आहे. तेहरानच्या उत्तर पूर्वेला परदिस भागात हा हल्ला झाला. हल्ल्याच्यावेळी लारीजानी मुलीच्या घरात होते. इस्रायली हल्ल्यात लारिजानी त्यांचा मुलगा मोर्तजा, डेप्युटी अलीरेजा बायात आणि त्यांच्या बॉडीगार्ड्सचा मृत्यू झाला.

इस्रायलने हे ऑपरेशन करुन इराणमधील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रहिवाशी भागांना लक्ष्य केलय. लारिजानी यांची हत्या त्यांच्या मुलीच्या घरात झाली. यामुळे इराणची सुरक्षा व्यवस्था आणि इंटेलिजन्सवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेने लारीजानी यांना इस्लामी गणराज्याचा आजीवन सेवक म्हटलं आहे. सकाळच्या समयी अली लारिजानी त्यांचा मुलगा मोर्तजा, अलीरेजा बायात आणि अनेक बॉडीगार्ड्स शहीद झाल्याचं सिक्योरिटी काउंसिलने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

इराणसाठी हा झटका का?

अली खामेनेई यांच्यानंतर इस्रायलने अली लारीजानी यांच्या रुपाने इराणमधल्या दुसऱ्या सर्वात शक्तीशाली माणसाला संपवलय. अली लारीजानी यांचा मृत्यू इराणसाठी झटका यासाठी आहे कारण इराणी सैन्याच्या ऑपेरशन्सच्या निर्णयात त्यांची महत्वाची भूमिका होती. सध्या इराणने खामेनेई यांचा मुलगा मोजतबाला नवीन नेता निवडलय. पण तो जिवंत आहे किंवा नाही हे ठामपणे कोणी सांगू शकत नाही.

इराणच्या सैन्य रणनितीवर हल्ला

इस्रायलने एक मोठा मोहरा टिपून थेट इराणच्या सैन्य रणनितीवर हल्ला केलाय. लारीजानी IRGC आणि इराणी सैन्याच्या प्रत्युत्तराच्या कारवाईचं नेतृत्व करत होते. अली लारीजानी यांनी इस्लामिक रिपब्लिकच्या स्ट्रक्चर म्हणजे रचनेची एक खोलवर समज होती. कारण देशात त्यांनी अनेक महत्वाची पद भूषवली आहेत.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग