AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यापाठोपाठ आणखी एका महापालिकेसाठी मेगाभरती, किती जागा भरणार?

नागपूर महानगरपालिकेत मेगाभरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. आरोग्य, तांत्रिक आणि प्रशासकीय विभागांतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. राज्यातील सुशिक्षित तरुणांसाठी ही सरकारी सेवेत रुजू होण्याची मोठी संधी आहे.

ठाण्यापाठोपाठ आणखी एका महापालिकेसाठी मेगाभरती, किती जागा भरणार?
Govt jobs
| Updated on: Mar 18, 2026 | 9:32 AM
Share

राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वत्रच मेगाभरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ठाणे महापालिकेपाठोपाठ नागपूर महानगरपालिकेतील (NMC) रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. तसेच यामुळे नागरी सेवांमध्ये विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका प्रशासनाने आता मोठ्या भरतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी पालिकेतील रिक्त असलेल्या ८,६५९ पदांवर भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या मेगाभरतीमुळे शहरातील हजारो तरुणांना सरकारी सेवेत येण्याची संधी मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन भरती झालेली नाही. यामुळे पालिकेत मनुष्यबळाचा अभाव ठळकपणे जाणवत होता. विशेषतः आरोग्य विभाग, स्वच्छता, अग्निशमन आणि तांत्रिक विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याहून कमी झाली होती. डॉ. इटनकर यांनी पदभार स्वीकारताच सर्व विभागांचा आढावा घेतला. यानंतर रिक्त जागांचा आकडा समोर येताच ही भरती प्रक्रिया प्राधान्याने राबवण्याचे आदेश दिले आहेत.

यानुसार नागपूर महापालिकेत केवळ तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील पदेच नाही, तर वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे भरण्यासाठीही पावले उचलली जाणार आहेत. वरिष्ठ पदांवरील रिक्त जागांमुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास विलंब होतो. त्यामुळे राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दरम्यान ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रवर्गातील पदांचा समावेश असेल. आगामी काळात या भरतीबाबतची अधिकृत जाहिरात आणि अर्जाची प्रक्रिया महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहितीही समोर आली आहे.

ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती

नागपूरसोबतच ठाणे महानगरपालिकेतही (TMC) मेगाभरतीची जोरदार तयारी सुरू आहे. ठाणे पालिकेने देखील आपल्या विविध विभागांमधील रिक्त जागांचा तपशील तयार केला आहे. यानुसार आरोग्य आणि तांत्रिक संवर्गातील पदांना प्राधान्य दिले जात आहे. ठाणे पालिकेच्या या भरती प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. ठाणे आणि नागपूर या दोन्ही शहरांमध्ये एकाच वेळी होत असलेल्या या हालचालींमुळे महानगरपालिका प्रशासनातील कार्यक्षमता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर