
हल्लीच्या काळात टक्कल पडणं ही एक सामान्य समस्या झाली आहे. केस गळणं आणि टक्कल पडणं या समस्या आता केवळ वयोवृद्धांशी संबंधित राहिलेल्या नाहीत. बदलती जीवनशैली, पोषकतत्त्वांच अभाव किंवा अनुवांशिक कारणांमुळे ऐन तारुण्यातही अनेकांना केस गळणं आणि टक्कल पडल्याची समस्या जाणवते. यावर मार्केटमध्ये हजारो प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मग ते हेअर ऑइल असो, शाम्पू असो, सिरम असो किंवा मसाजचं एखादं साधन असो.. डोक्यावर पुन्हा नव्याने केस उगवण्याची किंवा टक्कल घालवण्याची हमी देत हे प्रॉडक्ट्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यातही महागडे प्रॉडक्ट्स किंवा तेल वापरून टक्कल पूर्णपणे गेल्याचं किंवा नव्याने केस उगवल्याची उदाहरणं फारच क्वचित पहायला मिळतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये ‘आदिवासी हेअर ऑइल’ची विशेष चर्चा पहायला मिळतेय. या हेअर ऑइलची जाहिरात मोठमोठे सेलिब्रिटीही करू लागल्याने अनेकजण त्याकडे आकर्षित झाले आहेत. हे आदिवासी हेअर ऑइल आहे तरी काय, त्याची जाहिरात इतके मोठे सेलिब्रिटी का करत आहेत, हे तेल खरंच टक्कल घालवण्यावर आणि केस गळण्याच्या समस्येवर परिणामकारक आहे का, या तेलाच्या नावाने ग्राहकांची...