AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Bhasha Gaurav Diwas : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन ?

मराठी भाषेचा आज गौरव दिन आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची परंपरा आहे. याविषयी जाणून घेऊया.

Marathi Bhasha Gaurav Diwas : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन ?
मराठी भाषा गौरव दिन
| Edited By: | Updated on: Feb 27, 2026 | 8:28 AM
Share

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…’, कवी सुरेश भट यांच्या या सुंदर ओळी आपल्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा, वैभव मांडतात. महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन आहे.

मराठी भाषा गौरव दिन

आजचा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठी संस्कृती आणि साहित्याचा हा गौरव दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांच्या जयंती आणि मराठी भाषा गौरवदिन मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी जन्मदिवस. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो.

राज्यभर विविध कार्यक्रम

कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. मराठी भाषा गौरवदिनाचे निमित्त साधत राज्यभर विविध कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, कवी संमेलनांचे आयोजन केले जाते.

मराठी राजभाषा दिन म्हणजे काय?

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य बनले. त्याचबरोबर मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्य केले गेले. तेव्हापासून 1 मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ किंवा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा दिवस, या दोन्हींमधील फरक काय?

‘मराठी भाषा गौरव दिवस’ (27 फेब्रुवारी) आणि ‘मराठी राजभाषा दिवस’ (1 मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने 1 मे दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून सन 1965 पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंतराव नाईक सरकारने केला. 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे.

मराठीला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा कधी मिळाला?

मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारकडून अधिकृतपणे ‘अभिजात भाषेचा’ (Classical Language) दर्जा प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली, ज्यामुळे प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मराठीला हा प्रतिष्ठित दर्जा मिळाला.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी