
दिवाळी झाली आता तुलशीच्या लग्नानंतर लग्न सराई सुरु होईल आणि लग्नात नवरी म्हणून चांगलं दिसलच पाहिजे असा प्रत्येक मुलीचा हट्ट आणि इच्छा असते… तर तुम्हाला देखील लग्नाची शॉपिंग करायची असेल तर, भारतातील हे मार्केट बेस्ट ठिकाण आहे. लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर, वधूपासून ते तिच्या बहिणींपर्यंत सर्वांना त्यांच्या कपड्यांची काळजी वाटू लागते. बहुतेक वधूच्या बहिणी लेहेंगा घालणे पसंत करतात, जे शाही आणि श्रीमंत लूक देण्यासाठी योग्य मानले जातात.
सांगायचं झालं तर, दिल्लीतील चांदणी चौक बाजारपेठ हे बजेटमध्ये लेहेंगे खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की चांदणी चौकापेक्षा सुरतमध्ये स्वस्त लेहेंगे मिळतात. लेहेंगा फक्त 2 ते 3 वेळा घातला जातो… त्यामुळे महिलांना कमी किंमती असलेले लेहेंगे हवे असतात. जर तुम्ही 5 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लेहेंगा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सुरतमधील काही बाजारपेठांमध्ये फिरू शकता.
बॉम्बे मार्केट: सुरतचे बॉम्बे मार्केट हे त्याच्या बजेट-फ्रेंडली लेहेंग्यांसाठी ओळखले जाते. हे एक कापड केंद्र आहे जिथे पारंपारिक चनिया चोळी, लेहेंगा आणि साड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे मार्केट सोमवार ते शनिवार सुरु असते असते आणि रविवारी बंद असते. मार्केटमध्ये दुकाने सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु असतात. तुम्ही लेहेंग्यापासून साड्यांपर्यंत सर्व काही परवडणाऱ्या किमतीत येथे खरेदी करू शकता.
आदर्श बाजार: सुरतमधील हे बाजार कापड विक्रेत्यांसाठी ओळखले जाते, येथे तुम्हाला लेहेंगा, सूट आणि साड्यांचे अनेक डिझाइन मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील लेहेंग्यांच्या किमती खूपच परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त 5 हजार रुपयांमध्ये खूप चांगला लेहेंगा खरेदी करू शकता. हे बाजार रिंग रोडवर आहे.
ब्राइडल फॅक्टरी: सुरतच्या लक्ष्मी नगरमध्ये स्थित, हे ब्राइडल फॅक्टरी आउटलेट लेहेंग्यापासून ते साड्या आणि सूटपर्यंत सर्व काही देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही स्वस्त दरात सिंगल पीस देखील खरेदी करू शकता. तुम्हाला स्वस्त दरात 4 हजारहून अधिक लेहेंग्याचे डिझाइन मिळतील. ब्राइडल शॉपिंगसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे पोहोचण्यासाठी खाजगी कॅब उपलब्ध आहेत. याशिवाय, तुम्हाला नारायण नगर मार्केट आणि चौताबजारमधून अनेक प्रकारांमध्ये कटलरी आणि साड्या देखील मिळू शकतात.