
नवी दिल्ली : उन्हाळ्यात केवळ आपले आरोग्यच नाही तर त्वचेलाही सनबर्न (sunburn), टॅनिंग (tanning), चिडचिड आणि ओलावा नसणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यात त्वचेची विशेषत: चेहऱ्याची काळजी घेण्याची आव्हाने (skin care) आणखी वाढतात. जर तुम्हाला एकदाही सनबर्नचा त्रास झाला, तर त्याचा प्रभाव अनेक ऋतू टिकतो. निस्तेज त्वचेमुळे (dull skin) संपूर्ण लुक खराब होऊ शकतो. उन्हाळा असो की हिवाळा… चेहरा धुणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहीत असते. असे असूनही लोक अशा चुका करतात ज्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात.
चेहऱ्याशी संबंधित काही छोट्या-छोट्या चुका आपण करत असतो आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते. अशा काही चुका आहेत ज्या उन्हाळ्यात वारंवार करणे टाळावे. त्या बद्दल जाणून घेऊया.
चेहरा दोनवेळा न धुणे
उन्हाळ्यात चेहरा धुणे चांगले असते पण काही लोक हे दिवसातून एकदाच करतात. चेहरा दिवसातून किमान दोनदा धुवावा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी. ही पद्धत उन्हाळ्यात त्वचेची जळजळ आणि त्वचा काळी पडण्यापासून संरक्षण करते.
जास्त वेळा चेहरा धुणे
तर काही लोक उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना अनेक वेळा चेहरा धुण्याची चूक करतात. चेहऱ्यावर वारंवार पाणी आणि फेसवॉश लावल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. हे ओव्हरवॉशिंगच्या श्रेणीमध्ये आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण आपला चेहरा दिवसातून दोनदाच धुवावा.
ओव्हर एक्सफोलिएशन
उन्हाळ्यात टॅनिंग, सनबर्न आणि धूळ-मातीमुळे त्वचेवर मृत पेशी जमा होऊ लागतात. त्वचेवर चमक आणण्यासाठी, लोक जास्त प्रमाणात एक्सफोलिएशन पद्धतीचा अवलंब करतात ज्यामध्ये स्क्रबिंग सर्वात सामान्य आहे. त्वचेवर जास्त प्रमाणात वस्तू घासल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते आणि स्कि केअरची ही एक मोठी चूक आहे. तुम्ही आठवड्यातून दोनदा एक्सफोलिएशनचे रुटीन फॉलो करू शकता.
जास्त गरम पाण्याचा वापर करणे
गरम पाणी घाण आणि काळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी आहे असा अनेकांचा समज आहे. उन्हाळ्यात ही चूक मोठ्या नुकसानीचे कारण बनू शकते. उन्हाळ्यात त्वचा गरम पाण्याने स्वच्छ करण्याऐवजी साध्या पाण्याने स्वच्छ करण्याची पद्धत अवलंबवावी.