मुलांसमोर या पाच विषयांवर बोलणे टाळा, मुलांच्या मानसिकतेवर होऊ शकतो परिणाम
मुलांसमोर कोणतीही छोटी गोष्ट बोलताना किंवा वागताना विचार करणे गरजेचे असते. कारण ते पाहून मुले शिकत असतात. त्यामुळे प्रत्येक छोटी गोष्ट मुलांसमोर करताना करताना अतिशय विचारपूर्वक करावी लागते. काही विषय अशे असतात की पालकांनी त्याबद्दल मुलांसमोर कधीही चर्चा करू नये.

पालकांना नेहमी आपल्या मुलांना चांगले संगोपन आणि चांगले शिक्षण द्यायचे असते. जेणेकरून मुलं मोठी झाल्यावर त्यांचे भविष्य उज्वल तर होईलच पण ते एक चांगला माणूसही तयार होतील. आपल्या मुलांनी फक्त चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे यासाठी पालक सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी काही वेळा जाणून बुजून किंवा नकळत काही गोष्टी घडतात ज्याच्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि पुढे त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर ही परिणाम होतो. असे काही विषय आहे ज्यांची पालकांनी त्यांच्या मुलांसमोर चर्चा करू नये आणि कुटुंबातील इतर सदस्यांना ही ते समजावून सांगणे गरजेचे आहे. मुलांचे मन हे प्रामाणिक असते हे तुम्ही ऐकले असेल आणि ते खरं देखील आहे. मुलांचे मन खूप मऊ आणि स्वच्छ असते. आजूबाजूला ते जे काही पाहतात त्यातून ते शिकत असतात. त्यामुळे पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊ कोणते विषय पालकांनी मुलांसमोर बोलले टाळले पाहिजे.
भांडणांवर चर्चा करणे
पालकांनी मुलांसमोर कधीही भांडण करू नये किंवा त्यांच्यासमोर कोणताही वाद घालू नये. याशिवाय पालकांनी मुलांसमोर एकमेकांना दोष देऊ नये. यामुळे मुले खूप अस्वस्थ होतात आणि त्यांच्या नातेसंबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन बिघडू शकतो.
नातेवाईकांबद्दल नकारात्मक बोलणे
प्रत्येकाच्या नात्यात थोड्याफार प्रमाणात कलह असतो. पण मुलांसमोर नकारात्मक गोष्टी बोलणे, नातेवाईकांशी मतभेद असल्यावर त्याबद्दल चर्चा करणे शक्यतो टाळावे.
स्वतःची तुलना इतरांशी करणे
मुलांसमोर स्वतःची तुलना इतरांशी करू नये. मग तुमचा लूक असो किंवा तुमची आर्थिक परिस्थिती याचा मुलांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे देखील लक्षात ठेवा की तुमच्या मुलांची इतरांशी तुलना करू नका.
शाळेतील तक्रारी वारंवार घरी बोलू नका
प्रत्येक मुलाच्या शाळे कडून किरकोळ तक्रारी येत असतात. असे कधी तुमच्या मुलाच्या बाबतीत घडले असेल तर त्याला प्रेमाने समजावून सांगा. पण त्या विषयावर मुलांसमोर पुन्हा पुन्हा चर्चा करू नका. अन्यथा त्यांचा शाळेतील आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
आर्थिक स्थितीवर चर्चा करू नका
प्रत्येक मुलासाठी पैशाचे महत्व जाणून घेणे महत्त्वाचा आहे. परंतु एखाद्याने वारंवार गरीब आर्थिक स्थिती किंवा मुलांसमोर जास्त मोठेपणा करण्याबद्दल चर्चा करू नये. या दोन्ही परिस्थितीत मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.