Hair Mistakes : तुमच्या या चुकांमुळे तुटू शकते घनदाट केसांचे स्वप्न, आजच थांबवा या सवयी

काही वेळेस कळत-नकळतपणे आपण आपल्या केसांसंदर्भात काही अशा चुका करतो, ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या वाढतच जातात.

Hair Mistakes : तुमच्या या चुकांमुळे तुटू शकते घनदाट केसांचे स्वप्न, आजच थांबवा या सवयी
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 16, 2023 | 12:40 PM

नवी दिल्ली : जाड आणि मजबूत केस (long and strong hair)  प्रत्येकाला हवे असतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आपण काय-काय करत असतो. एकापेक्षा एक महाग, ब्रँडेड उत्पादन वापरतो. काही वेळेस घरगुती उपाय (home remedies)  देखील केले जातात, परंतु तरीही केसांशी संबंधित समस्या कमी होत नाही. काही वेळेस तर त्या बंद झाल्या तरी पुन्हा त्रास सुरू होतो. काही वेळेस कळत-नकळतपणे आपण आपल्या केसांसंदर्भात काही अशा चुका (mistakes about hair) करतो, ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या वाढतच जातात. आज अशाच काही चुकांबद्दल जाणून घेऊया, ज्याकडे वेळीच लक्ष देऊन तुम्ही तुमचे केस सर्व समस्यांपासून वाचवू शकाल.

केसांसंदर्भात या चुका टाळा

1) केस वारंवार कंगव्याने विंचरणे टाळावे. कारण केस जास्त विंचरल्याने तुमचे केस कमकुवत तर होतीलच शिवाय ते तेलकटही होतील. गुंता झालेले केस सोडवण्यासाठी तुम्ही रुंद दातांचा कंगवा वापरावा आणि हळुवारपणे जटा सोडवाव्यात.

2) केस धुण्यासाठी कमीत कमी शांपू वापरावा हे मान्य आहे. कारण जास्त केस धुण्याने केस खराब होतात. पण तुम्ही बराच काळ केस धुतले नाहीत, असेही करू नका. जास्त वेळ केस न धुतल्याने केसांचे कूप ब्लॉक होतात, ज्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच दर तिसऱ्या दिवशी केस धुणे चांगले असते.

3) जर तुम्ही केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा जास्त वापर करत असाल तर असे करणे टाळावे कारण त्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात.

4) केस ओले असताना सर्वात कमकुवत असतात. ओले केस झाडल्यावर ते अधिक तुटू शकतात. केसांच्या समस्या टाळण्यासाठी कधीही ओले केस विंचरून त्याची हेअर स्टाइल करू नका. ते प्रथम वाळू द्यावेत, त्यानंतरच स्टाइलिंग साधने वापरा.

5) कंगवा आणि स्टाइलिंग साधने नियमितपणे स्वच्छ केली पाहिजेत. कारण त्यांच्यावर साचलेली घाण तुमचे केस खराब करू शकते. कंगवा आणि ब्रश आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावेत. काही महिन्यांच्या वापरानंतर ते बदलणे चांगले आहे, कारण नंतर त्यामुळे डोक्यात संसर्ग होऊ शकतो.

6) केस उघडे ठेवून कधीही झोपू नका. कारण त्यामुळे त्यांचा गुंता होण्याची अधिक शक्यता निर्माण होते.

7) संतुलित आहार न घेतल्यानेही केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात. जर तुम्ही अनारोग्यकारक आहार घेत असाल तर त्याचा केवळ केसांवरच वाईट परिणाम होत नाही तर आरोग्यासही अनेक धोका निर्माण होतात. केस निरोगी ठेवण्यासाठी, संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांचा समावेश आहे.

8) केस ओले ठेवून झोपण्याची चूक कधीही करू नका. ते नेहमी नीट वाळवून, कोरडे करून मगच झोपावे. कारण ओले केस ठेवून झोपल्याने ते सकाळी खूप फ्रिजी होतात आणि त्यातील गुंता सोडवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात.