
आजच्या काळात असंख्य लोक तणाव, थकवा आणि अनियमित जीवनशैलीशी झुंज देत आहेत. त्यावर योग हा एक महत्त्वाचा उपाय ठरत आहे. योगामुळे तन, मन आणि आत्म्याला संतुलित ठेवण्याचं काम होतं. योग ही शरीर आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याची हजारो वर्षापासूनची पद्धत आहे. पण लोक योग करताना चुका करत असतात हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे लाभ होण्याऐवजी नुकसानच होतं. प्राचीन योग पंरपरांचं गूढ ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणारे योग गुरू रामदेव बाबा यांच्या मते, योग करताना काही नियम आणि सावधानता पाळली पाहिजे. तसं न करणं शरीर आणि मन दोन्हीसाठी हानिकारक ठरू शकतं.
रामदेवब बाबा भारतातील प्रसिद्ध योग गुरू आहेत. त्यांनी योग घराघरात पोहोचवण्याचं मोठं काम केलं आहे. प्राचीन भारतीय योग विद्येला आधुनिक जीवनशैलीशी जोडून सामान्य लोकांसाठी सरळ, सहज आणि उपयोगी बनवण्याचं काम त्यांनी केलं आहे. नियमित योगाभ्यास केवळ आजारांशी लढण्याची शक्ती देत नाही तर जीवनाला ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकतेने भरू टाकतो. योग योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य भावनेने केल्यास त्याचा पूरअण लाभ मिळतो, असंही रामदेव बाबा म्हणतात. रामदेव बाबांचं पुस्तक ‘Yog Its Philosophy And Practice’ मध्ये योग करण्याचे काही खास नियम सांगितले आहेत. तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बाबा रामदेव यांचं पुस्तक ‘Yog Its Philosophy And Practice’मध्ये योग आसन सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा करणं चांगलं असल्याचं सांगितलं आहे. जर तुम्हाला एकाच वेळी योग करायचं असेल तर सकाळी योग करणं कधीही चांगलं. यावेळी मेंदू आणि शरीर दोन्ही शांत असतं. तुम्ही घरातील सर्व कामे आवरूनही सकाळी योग करू शकता. तर संध्याकाळी जेवल्यावर 5-6 तासानंतरच योग केला पाहिजे.
योग सहज करण्यासाठी योग्य जागा अधिक महत्त्वाची असते. योग करण्यासाठी तुम्ही स्वच्छ, गवत असलेल्या जागेवर बसू शकता. या शिवाय नदी किंवा पुलाच्या बाजूला बसूनही तुम्ही योग करू शकता. उघड्या जागेवर योग केल्याने शरीराला चांगलं ऑक्सिजन मिळतं. घरात तुम्ही योग करत असाल तर तुम्ही वॉर्म लाइट लावला पाहिजे.
योग करताना कपड्यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी योग्य निवड असणं आवश्यक आहे. पुरुषांनी हाफ पँट आणि शॉर्ट्स घालून योग करावा. तर महिलांना सलवार कुर्ता आणि ट्रॅक सूट परिधान करावे. योग आसन करताना या कपड्यात कंफर्टेबल फिल होतं.
योग गुरू रामदेव बाबांच्या पुस्तकानुसार, योग आसन करण्याच्या अर्ध्या किंवा एक तासानंतरच खाल्लं पाहिजे. तसेच साधं आणि कमी मिर्च मसाला असलेलं जेवण करावं. नाही तर पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतील. योग आसन केल्यानंतर चहा पिणं टाळा. त्याचा पाचन तंत्रावर परिणाम होऊ शकतो. अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.