AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी खर्चात बाल्कनीला द्या भन्नाट लूक, होईल घरातील सर्वात स्पेशन कोपरा

तुमच्या घरी देखील बाल्कनी असेल आणि ती मोकळीच असेल तर, तुम्ही खास लूक देऊ शकता. कमी खर्चात तुमची गॅलरी, घरातील सर्वात स्पेशल जागा होऊ शकते... तर जाणून घ्या खास टिप्स...

कमी खर्चात बाल्कनीला द्या भन्नाट लूक, होईल घरातील सर्वात स्पेशन कोपरा
| Updated on: Aug 30, 2026 | 3:02 PM
Share

अनेकांच्या घरी छोटी तरी बाल्कनी असते. पण त्या बाल्कनीचा कसा वापर करायचा. याबद्दल कोणाला कळत नाही. त्यामुळे बाल्कनी फक्त कपडे वाळवण्यासाठी राहते. पण काही सोप्या टिप्स वापरल्या की, तुम्ही सुंदल बाल्कनी करु शकता. सर्वप्रथम, तुम्हाला बाल्कनीचा वापर कसा करायचा आहे ते ठरवा. सकाळच्या चहा किंवा कॉफीसाठी, पुस्तकं वाचण्यासाठी, किंवा घरून काम करण्यासाठी. जर तुम्हाला कपडे वाळवायचे असतील, तर ते झाल्यावर ती जागा मोकळी राहील अशी व्यवस्था करा.

लहान बाल्कनीमध्ये जमिनीवरची जागा कमी असते. त्यामुळे, खाली कुंड्या किंवा फर्निचर ठेवण्याऐवजी, भिंतीवर शेल्फ, उभ्या कुंड्या किंवा फोल्डिंग टेबल लावा. तसेच, कपडे वाळवण्यासाठी भिंतीवर लावता येणारे किंवा फोल्डिंग स्टँड वापरा. ज्यामुळे पसारा दिसणार नाही आणि बाल्कनीला एक वेगळी लूक येईल.

बाल्कनीमध्ये बसण्यासाठी महागडा आणि मोठा सोफा विकत घेण्याची गरज नाही. एक छोटी आरामदायी खुर्ची आणि एक छोटे साईड टेबल पुरेसे आहेत. ही मांडणी तुमचा सकाळचा चहा किंवा संध्याकाळचे निवांत क्षण अविस्मरणीय बनवेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बाल्कनीमध्ये हिरवळ छान दिसते, पण खूप जास्त कुंड्यांमुळे जागा अरुंद वाटते. तुमच्या बाल्कनीमध्ये किती सूर्यप्रकाश येतो त्यानुसार वनस्पतींची निवड करा आणि रेलिंगवर कुंड्या ठेवताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या.

घरात जागा कमी असल्यास, बाल्कनीच्या भिंतीवर फोल्डिंग टेबल ठेवून एक छोटी कामाची जागा तयार करता येते. उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी बांबूचे पडदे किंवा ब्लाइंड्स वापरता येतात. बाल्कनीचा वापर कपडे वाळवण्यासाठी किंवा साफसफाईचे साहित्य ठेवण्यासाठी करा, पण तिला कायमस्वरूपी साठवणुकीची खोली बनवू नका. कपडे वाळल्यावर स्टँडची घडी करून तो बाजूला ठेवा आणि साफसफाईचे साहित्य ठेवण्यासाठी एक लहान कपाट किंवा डबा ठेवा.

सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, भारतीय हवामानाचा सामना करू शकेल असे फर्निचर निवडा. तसंच, बाल्कनीचा प्रत्येक कोपरा भरण्याऐवजी, थोडी मोकळी जागा सोडा जेणेकरून तुम्हाला तेथे खास वेळ व्यतीत करता येईल येईल आणि ताज्या हवेचा आनंद घेता येईल.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच