पावसाळ्यात पाण्याची कमतरता तसेच डिहाइड्रेशनची समस्या टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

बरेच लोक त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तसेच पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे वातावरणातील गारव्यामुळे आपल्या तहान लागत नाही त्यामुळे पाण्याचे सेवन कमी प्रमाणात होते. अशातच शरीराला पाण्याची कमतरता भासू लागते. त्यामुळे डिहाइड्रेशन व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. यासाठी शरीर डिहाइड्रेड होऊ नये याकरिता या उपायांचा अवलंब करा...

पावसाळ्यात पाण्याची कमतरता तसेच डिहाइड्रेशनची समस्या टाळण्यासाठी करा हे उपाय
पावसाळ्यात पाण्याची कमतरता तसेच डिहाइड्रेशनची समस्या टाळण्यासाठी करा 'हे' उपाय
Image Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Jul 12, 2025 | 3:31 PM

पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा आणि आर्द्रता निर्माण होत असते. त्यामुळे आपण दिवसभरात पाणी खूप कमी प्रमाणात पित असतो. तर काहींना या दिवसात पाण्याअभावी किंवा हवामानातील आर्द्रतेमुळे जास्त घाम येतो, त्यामुळे एखाद्याला डिहायड्रेशनची समस्या सतावते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे पाणी प्यावसे वाटत नसले तरी दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पित राहणे गरजेचं आहे. अशातच जर कोणी दिवसभर पुरेसे पाणी पीत नसेल तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

दिवसातून किती पाणी पिणे योग्य आहे हे तुमच्या दिनचर्येवर आणि ॲक्टिव्हिटीवर अवलंबून असले तरी तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा कमी पाणी प्यायले तर शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. यामुळे हृदयावरही वाईट परिणाम होतो. जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही दिवसा पुरेसे द्रवपदार्थ घेऊ शकत नसाल तर रात्री डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. तर शरीरातील पाण्याची कमतरता या उपायांच्या मदतीने पूर्ण केली जाऊ शकते. कशी ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

  • डिहायड्रेशनमुळे या समस्या उद्भवू शकतात
  • डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते.
  • तुम्हाला एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी असणे, थकवा किंवा चिंता जाणवू शकते.
  • बद्धकोष्ठतेची समस्या सतावू शकते.
  • त्वचेची कोरडेपणा किंवा ओठ फुटणे.
  • लघवीचा रंग बदलतो आणि लघवीच्या संसर्गाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो .
  • कमी पाणी पिल्याने स्नायू आणि सांधे दुखू शकतात.
  • कधीकधी पाण्याच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात.
  • केवळ पाण्याने शरीर हाइड्रेशन होत नाही

दिवसभर फक्त पाणी पिणे म्हणजे हायड्रेटेड राहणे नाही. जर तुम्ही इतर कोणत्याही स्वरूपात द्रवपदार्थ घेतले तर त्याचा कमतरता देखील पूर्ण होऊ शकतो. काकडी, टोमॅटो, द्राक्षे, टरबूज, शिमला मिरची, संत्री , दही, सूप आणि स्मूदी यासारख्या फळे आणि भाज्यांसोबतच पाण्याची कमतरता देखील पूर्ण करू शकतात.

डिहायड्रेशन कसे टाळावे

  • संध्याकाळपर्यंत थोडे थोडे पाणी पित राहा आणि रात्रीच्या जेवणात सूप किंवा सॅलड सारखे पदार्थ खा.
  • रात्रीच्या जेवणाच्या वेळी अल्कोहोल किंवा कॅफिनयुक्त पेये यांसारखी निर्जलीकरण करणारी पेये पिणे टाळा.
  • रात्री उशिरापर्यंत पाण्याची कमतरता पूर्ण करताना संध्याकाळी फळांचे सेवन करा. जर तुम्ही संध्याकाळी जिमला गेलात तर तुमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवण्यास विसरू नका.
  • जर तुम्हाला पाणी पिणे कंटाळवाणे वाटत असेल तर तुम्ही लिंबू पाणी तसेच काकडी आणि पुदिना यांचे डिटॉक्स वॉटर तयार करून पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)