पाणी स्वच्छ करण्यासोबतच त्वचाही स्वच्छ करते तुरटी, जाणून घ्या तुरटीच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे

तुरटी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. पिंपल्स, मुरूम, डाग आणि सुरकुत्या यावर तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास फायदा होतो. पण तुरटीच्या पाण्यात गुलाब पाणी मिसळून चेहरा स्वच्छ केल्याने त्वचेला दुप्पट फायदे मिळतात.

पाणी स्वच्छ करण्यासोबतच त्वचाही स्वच्छ करते तुरटी, जाणून घ्या तुरटीच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे
| Edited By: | Updated on: Jan 17, 2025 | 10:14 PM

तुरटी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुरटीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. त्वचेच्या अनेक समस्यांमध्ये ही खूप फायदेशीर मानली जाते. सलून मध्ये दाढी केल्यानंतर पुरुषांच्या चेहऱ्यावर एकदा तुरटी लावली जाते. पण तुरटीच्या पाण्याने चेहरा धुण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुरटीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे अनेक फायदे होतात. या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा चमकदार होते यासोबतच चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स सारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो. जाणून घेऊ तुरटीच्या पाण्याचे आणखीन त्वचेला काय फायदे होतात.

सुरकुत्यांसाठी फायदेशीर

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुरटीचे पाणी फायदेशीर मानले जाते. त्वचेवर असलेल्या फाईन लाइन्स देखील कमी करण्याचे काम तुरटीचे पाणी करते. त्यासोबतच वाढत्या वयामुळे त्वचा सैल होते तर त्वचेला सैल न होऊ देण्याचे काम देखील तुरटीचे पाणी करते.

मुरूम आणि पिंपल्सवर फायदेशीर

जर तुम्हाला मुरूम किंवा पिंपल्सची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने चेहरा धुण्यास सुरुवात करा. यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काम करतात त्यामुळे त्वचेवरील सूजही कमी होते.

तेलकट त्वचा

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवावा. हे त्वचेतून अतिरिक्त तेलाचे शोषण करते. याशिवाय ते तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करते. तुरटीचे पाणी त्वचेच्या मृतपेशी काढून टाकण्यास देखील मदत करते.

पुरळ आणि जळजळ होत असल्यास फायदेशीर

तुरटीच्या पाण्याने चेहरा धुऊन त्वचेची जळजळ, पुरळ आणि खाज येण्याची समस्या सहज कमी होऊ शकते. त्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात हे त्वचेला थंडपणा आणि आराम देण्याचे काम करतात त्यामुळे सूजही कमी होते.

जर तुम्ही तुरटीच्या पाण्याने चेहरा धुणार असाल तर तुरटी थोड्याच प्रमाणात मिसळा त्यासोबतच त्यात गुलाब पाणी ही टाका.