जास्वंदाच्या फुलांचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवा !

| Updated on: Jun 15, 2021 | 6:14 PM

त्वचेवर वयाचा प्रभाव रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर ठेवण्यासाठी तुम्ही जास्वंदाच्या फुलांचा फेस मास्क तयार करू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या उकळा. नंतर त्यांना बारीक वाटून घ्या आणि पेस्ट तयार करा.

जास्वंदाच्या फुलांचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवा !
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : त्वचेवर वयाचा प्रभाव रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर ठेवण्यासाठी तुम्ही जास्वंदाच्या फुलांचा फेस मास्क तयार करू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या उकळा. नंतर त्यांना बारीक वाटून घ्या आणि पेस्ट तयार करा. यानंतर त्यात मधाचे काही थेंब घाला आणि नंतर ही पेस्ट चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. काही काळ अशीच राहू द्या. (Apply Jaswant flower face pack on face and get beautiful skin)

जेव्हा ही पेस्ट सुकते तेव्हा आपले तोंड पाण्याने धुवा. हा फेस मास्क आपल्या चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक आणेल. विशेष म्हणजे ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा वापरू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अँटी-एजिंग मास्क तयार करण्यासाठी, मध आणि तेल आवश्यक आहे. तीन चमचे मधात तेल मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा.

ही पेस्ट थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. ही पेस्ट थंड झाल्यावर चेहऱ्याला 20 ते 25 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत पेस्ट चेहऱ्यावरील काढा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण ही पेस्ट आठवड्यातून 2 ते 3 दिवस लावली पाहिजे. ही पेस्ट आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या पेस्टमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

हा फेसपॅक तयार करण्यासाठी बाजारात चारकोलच्या गोळ्या सहज उपलब्ध होतात. या गोळ्यांना चागंल्या प्रकारे बारीक करुन घ्या. त्यानंतर व्हिटॅमिन ई ची गोळी घेऊन ती या चारकोलमध्ये मिसळावी. गरज असल्यास त्यात थोडे पाणी मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर मास्क लावल्याप्रमाणे लावावे. हे मिश्रण चेहऱ्यावर कोरडे झाल्यानंतर हलक्या हातांनी काढून टाका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!

Health Aging | घरातील वृद्धांना ‘या’ पदार्थांपासून ठेवा दूर, अन्यथा आरोग्याला होईल नुकसान!

(Apply Jaswant flower face pack on face and get )