चेहऱ्यावर मुलतानी माती लावताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर तुमची त्वचा होऊ शकते कोरडी
चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे अनेक फायदे असले तरी, ती योग्य पद्धतीने न लावल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता,धूळ आणि घामामध्ये चेहऱ्याची चमक टिकवून ठेवणे कठीण असते. अशावेळेस लोकं अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करतात. घरगुती उपायांमध्ये मुलतानी मातीचा सर्वाधिक वापर केला जातो. जी चेहऱ्यावर लावल्यावर अनेकांना त्वरित ताजेपणा जाणवतो, परंतु हाच पॅक तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने लावल्यास त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. काहींच्या चेहरा यामुळे कोरडी होते, तर काहींना ती ताणल्यासारखी वाटू लागते. अशा परिस्थितीत मुलतानी माती लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून चेहरा स्वच्छ, ताजे आणि चमकदार दिसेल. चला तर मग आजच्या लेखात मुलतानी माती चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.
मुलतानी माती विशेष का मानली जाते?
मुलतानी माती एक नैसर्गिक क्लीन्झर मानली जाते. ती चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, धूळ आणि घाण काढून टाकण्यास मदत करते . उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठीही तिचा वापर केला जातो. तेलकट त्वचा असलेले लोक त्यांच्या स्किन केअर करताना मुलतानी मातीला पसंती देतात, कारण त्यामुळे चेहरा ताजेतवाने वाटतो.
लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा
मुलतानी माती लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. चेहऱ्यावर असलेला कोणताही मेकअप, धूळ किंवा घाम यामुळे घरी बनवलेला मुलतानी मातीचा फेस पॅक योग्यरित्या काम करणार नाही. यासाठी सौम्य फेस वॉशने चेहरा धुतल्यानंतरच तो लावा.
तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार घटक मिक्स करा प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे मुलतानी मातीत मिक्स केलेले घटकही वेगवेगळे असू शकतात. तेलकट त्वचेसाठी गुलाबजल चांगले मानले जाते. तसेच ज्यांची त्वचा कोरडी आहे, ते त्यात दही किंवा मध मिक्स करू शकतात. ज्यांना मुरुमांची समस्या सतावत असते ते त्वचेवर मुलतानी मातीच्या फेसपॅकमध्ये कोरफडीचा गर लावणे फायदेशीर मानले जाते.
मुलतानी मातीचा पॅक त्वचेवर पूर्णपणे सुकवू नका
बरेच लोकं मुलतानी मातीचा पॅक चेहऱ्यावर लावल्यावर पूर्णपणे सुके होईपर्यंत चेहऱ्यावर तशीच ठेवतात. मात्र तज्ज्ञांच्या मते असे केल्याने त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. पॅक थोडासा सुकल्यानंतरच चेहरा धुणे उत्तम ठरते.
चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा
मुलतानी माती काढल्यानंतर चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर लावा. यामुळे तुमची त्वचा मऊ राहते आणि कोरडी पडत नाही.
मुलतानी मातीचा फेसपॅक वापर किती वेळा केला पाहिजे?
तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी याचा वापर आठवड्यातून दोनदा करावा, तर कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी याचा वापर आठवड्यातून एकदाच करावा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)