
बटाटा हा आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मग ती भाजी असो, पराठे असोत की स्नॅक्स, बटाट्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते. पण बटाटा वापरताना आपण त्याच्या साली सहसा कचऱ्यात टाकतो. ज्या साली तुम्ही कचरा समजता, त्या तुमच्या आरोग्यासाठी बटाट्यापेक्षाही अधिक गुणकारी ठरू शकतात. या साली पोषक तत्त्वांचा खजिना आहेत. त्यांचा वापर अनेक प्रकारे करता येतो. चला, जाणून घेऊया बटाट्याच्या सालींचे आश्चर्यकारक फायदे आणि त्यांचा वापर कसा करावा.
बटाट्याच्या सालींमध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी6 यांसारखी अनेक पोषक तत्त्वे दडलेली आहेत. ही तत्त्वे तुमच्या एकूण आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. बटाट्याच्या तुलनेत त्याच्या सालींमध्ये काही पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात असतात. उदाहरणार्थ, सालींमध्ये बटाट्याच्या 80% लोह असते. त्यामुळे बटाटा सालींसह खाल्ल्यास तुम्हाला अधिक पोषण मिळते.
पचनक्रिया सुधारते: बटाट्याच्या सालींमध्ये फायबर मुबलक असते. हे फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर राहतात. सालींसह बटाटा खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
रक्ताची कमतरता भरून निघते: सालींमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. विशेषतः मुलांना आणि प्रौढांना याचा फायदा होतो. रक्ताची कमतरता असलेल्यांसाठी सालींसह बटाटा खाणे उपयुक्त ठरते.
हाडे मजबूत होतात: वृद्ध व्यक्तींसाठी बटाट्याच्या साली खूप फायदेशील आहेत. त्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत ठेवतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो.
मुरुमांपासून सुटका: सालींमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. सालींचा रस मुरुमांवर लावल्याने मुरुमे कमी होतात. त्वचेवरील डागही हलके होतात.
त्वचा उजळते: सालींचा रस त्वचेवर लावल्याने त्वचा नितळ आणि चमकदार होते. यामुळे टॅनिंग आणि पिगमेंटेशनच्या समस्या कमी होतात.
बटाट्याच्या सालींचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवा:
स्वच्छता : बाजारातून आणलेले बटाटे स्वच्छ पाण्याने धुवा. सालींवरील माती पूर्णपणे निघाली पाहिजे.
उकडून वापर: बटाटा सालींसह उकडा. उकडलेल्या बटाट्याच्या साली सहज खाल्ल्या जाऊ शकतात. यामुळे पोषणही मिळते आणि चवही चांगली लागते.
विविध पदार्थ: सालींसह बटाट्याचे फ्राय, रोस्टेड बटाटे, सूप किंवा स्टफ पराठे बनवता येतात. साली पीसून त्याचा रस त्वचेवर लावता येतो.
खराब बटाटे टाळा: जुनाट बटाटे, ज्यांवर अंकुर किंवा हिरवी बुरशी दिसते, अशा बटाट्यांच्या साली वापरू नका. यात सोलेनिन नावाचे विषारी द्रव्य असते. हे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)