Skin Care : स्नानानंतर जाड कपड्याने अंग पुसू नका, कारण काय? वाचा

| Updated on: Jul 11, 2021 | 4:44 PM

आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूमाची समस्या निर्माण होऊ शकते.

Skin Care : स्नानानंतर जाड कपड्याने अंग पुसू नका, कारण काय? वाचा
आंघोळ
Follow us on

मुंबई : आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेतल्याने आपल्या चेहऱ्यावरील समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या काही सवयींमध्ये थोडा बदल केला पाहिजे. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. आपल्या सर्वांना सवय असते की, स्नान झाल्यावर जाड कपड्याने त्वचा पुसण्याची मात्र, आपली ही सवय अत्य़ंत चुकीची आहे. (Do not wipe the Body with a thick cloth after bathing)

यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेचा टोन खराब होऊन त्वचा उलण्यास सुरूवात होते. रोज सनस्क्रीन लावावे. सुरकुत्या कमी करण्यासाठी एमपीएफ 30 पेक्षा कमी असणाऱ्या क्रिमचाच वापर करा. घराबाहेर पडण्याआधी चेहऱ्यावर मॉईश्चरायझर क्रीम आवश्य लावावी. पाण्यामुळे चेहऱ्यावरील मुलायमपणा टिकून राहतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो.

त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी, लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे करायला पाहिजे. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते.  तपकिरी तांदळामध्ये असलेले सेलेनियम त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते.

चमकदार त्वचेला उपयुक्त प्रकारचा पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला 2 चमचे तपकिरी तांदूळ आणि 1 चमचा दही घ्यावे लागेल. प्रथम तपकिरी तांदूळ बारीक करा. एक चमचा साधा दही घेऊन त्यात अर्धा चमचा बारीक केलेला तांदूळ मिसळा. हे मिश्रण तुमच्या चेहर्‍यावर लावा. सुमारे 10 मिनिटे असेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग करू शकता. यानंतर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार झालेली पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do not wipe the Body with a thick cloth after bathing)