AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

हिवाळ्याच्या हंगामात आपली त्वचा कोरडी पडणे हे सामान्य आहे. मात्र, काही लोकांची बाराही महिने त्वचा कोरडी पडते. कोरड्या त्वचेमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेष: कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वाढते.

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
सुंदर त्वचा
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 26, 2021 | 7:51 AM
Share

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात आपली त्वचा कोरडी पडणे हे सामान्य आहे. मात्र, काही लोकांची बाराही महिने त्वचा कोरडी पडते. कोरड्या त्वचेमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेष: कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वाढते. कोरडी त्वचा कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. (Do this home remedy to get rid of the problem of dry skin)

कोरडी त्वचा दूर करण्यासाठी खोबरेल तेलात बेसन पीठ मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण अर्धा तास ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण दिवसातून एकदा तरी लावला पाहिजे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. मात्र, हा फेसपॅक लावताना पेस्ट नेहमीच ताजी असावी. पेस्ट एकदाच तयार करून ठेऊ नका. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यानंतर चेहऱ्याला दुसरे काहीही लावू नका.

हळद आणि बेसन पीठाचे उठणे तयार करण्यासाठी, एक चमचा हळद आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यात एक चमचा मलई आणि थोडे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बेसन पिठात दहीदेखील मिसळू शकता. केळी आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका वाडग्यात केळी मॅश करावी लागतील.

या केळ्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर तुम्ही अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचा चेहरा मॉइश्चराइझ होऊ शकेल. हा स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचा कॉफी पावडरमध्ये अर्धा चमचा मध, शुद्ध तूप आणि पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट लावल्यानंतर हलक्या हातांनी हळूहळू 4 ते 5 मिनिटांसाठी मसाज करा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do this home remedy to get rid of the problem of dry skin)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल