Eye Care: डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!

झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा ताणतणावामुळे आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल होतात. आजच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या चेहर्‍यावर आणि डोळ्यांवर विशेषतः दिसून येतो.

Eye Care: डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पाहा!
डोळ्याखालील सर्कल घालवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 12:08 PM

मुंबई : झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा ताणतणावामुळे आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल होतात. आजच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या चेहर्‍यावर आणि डोळ्यांवर विशेषतः दिसून येतो. डोळ्यांची काळजी न घेतल्यास डार्क सर्कल होतात. डार्क सर्कल कमी करण्यासाठी आम्ही आज खास घरगुती टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची डार्क सर्कलची समस्या दूर होईल. (Do this home remedy to reduce dark circles)

डार्क सर्कल कमी करण्यासाठी बदामाचे तेल आणि मध अत्यंत फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. बदाम तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्याबरोबरच नमीयुक्त ठेवते. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर बदामाचे तेल आणि मध मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा. रात्री डोळ्यांना लावा आणि सकाळी थंड पाण्याने धुवा.

‘व्हिटामिन ई’ मुरुमे आणि डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. तसेच यामुळे आपला त्वचेचा टोन चांगला राहतो. डार्क सर्कल कमी करण्यासाठी व्हिटामिन ईच्या तेलात कोरफड जेल मिसळावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल आपण डोळ्यांभोवती लावू शकता. दररोज 8 तास झोप घ्या. तसेच नेहमी सरळ रेषेत झोपा. पोटावर किंवा एका कुशीवर झोपल्यामुळे लिम्फॅटिक अॅसिड जमा होते आणि आपला चेहरा फुगतो.

डोळे निरोगी राहण्यासाठी आणि काळी वर्तुळे जाण्यासाठी आपण आय क्रीम लावली पाहिजे. आय क्रीम लावून डोळ्यांना मॉइश्चरायझेशन केले पाहिजे. आय क्रीम लावणे केवळ डोळ्यांसाठीच नव्हे तर आपल्या त्वचेच्या काळजीसाठीही फायदेशीर आहे. डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा जितकी जास्त मॉइस्चराइझर होईल तितकीच तुमची डोळे अधिक चांगली होतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

(Do this home remedy to reduce dark circles)