लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; जाणून घ्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन तुमच्या केसांसाठी ठरेल उपयोगी!

निरोगी केसांसाठी खाद्यपदार्थ : केसांना खोल पोषण देण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करावा. केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; जाणून घ्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन तुमच्या केसांसाठी ठरेल उपयोगी!
लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेशImage Credit source: stock.adobe.com
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:38 PM

केस गळणे आणि टाळूला खाज सुटणे कोणालाही आवडत नाही. केसांशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी लोक अनेक मार्ग वापरतात. अशा परिस्थितीत लोक महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा (Cosmetics) वापर करतात. केसांसाठी महागडी उपचार पद्धतीही वापरतात परंतु, त्यांचा प्रभाव केसांवर जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत आरोग्यदायी पदार्थही महत्त्वाची भूमिका बजावतात. रोजच्या आहारातच पोषण असलेले पदार्थ (Nutritious foods) समाविष्ट केले तर, केसांच्या वाढीसाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. आरोग्यदायी पदार्थ पोटात गेल्यानेच केसांची मुळे मजबूत होतात त्यामुळे केसही लांब होतात. निरोगी पदार्थ केसांना खोल पोषण (Deep nourishment to the hair) देण्याचे काम करतात. लांब आणि निरोगी केसांसाठी तुम्ही विविध आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. लांब केसांसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

अंडी

रोज एका अंड्याचे नियमित सेवन करा. अंड्यांमध्ये प्रोटीन आणि बायोटिन असते. हे केस वाढवण्याचे काम करते. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी केसांसाठी तुम्ही अंडी खाऊ शकता.

पालक

पालकामध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि फोलेट असते. हे केसांना खोलवर पोषण देते. हे केस निरोगी ठेवण्याचे काम करते. याचे सेवन केल्याने डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.

सोयाबीन

सोयाबीनचे सेवन केसांसाठी खूप चांगले असते. याच्या नियमित सेवनाने केस मजबूत आणि घट्ट होण्यास मदत होते. तुम्ही सोयाबीनचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही ते तळू शकता किंवा करीमध्ये घालू शकता. हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी देखील आहे.

वाळलेली फळे आणि बिया

सुका मेवा अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये वापरला जातो. ते खूप चवदार आणि निरोगी आहेत. त्यात ओमेगा-3 असते. तुम्ही आहारात अक्रोड, बदाम, चिया बिया, भोपळ्याच्या बिया आणि दुधीच्या बियांचा समावेश करू शकता. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी केसांसाठी त्यांचा आहारात नक्कीच समावेश करा.

एवोकॅडो

एवोकॅडो केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करण्याचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केस मुळापासून मजबूत आणि घट्ट होतात.

कडधान्य

कडधान्य हे संपूर्ण धान्य मानले जात असून, ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बायोटिन, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे केस मजबूत होतात.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.