Skin Care : कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मध अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

| Updated on: Dec 06, 2021 | 9:29 AM

हिवाळ्याच्या हंगामात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही खास घरगुती उपाय केले पाहिजे. आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे अनेक घटक आहेत. ज्याचा वापर करून आपण हिवाळ्यातही तजेलदार त्वचा मिळू शकतो.

Skin Care : कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मध अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!
कोरड्या त्वचेची समस्या
Follow us on

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात त्वचेचा कोरडेपणा दूर (Dry skin) करण्यासाठी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही खास घरगुती उपाय केले पाहिजे. आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे अनेक घटक आहेत. ज्याचा वापर करून आपण हिवाळ्यातही तजेलदार त्वचा मिळू शकतो. आपल्याला माहीती आहे की, मध आपल्या आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर ठेवण्यासाठी आपण दररोज सकाळी एक चमचा मधामध्ये पाणी मिक्स करून त्वचेला लावले पाहिजे. मध आणि पाणी त्वचेला लावल्यानंतर साधारण वीस मिनिटे मसाज करणे फायदेशीर आहे. यामुळे आपली त्वचा कोरडी होणार नाही आणि तजेलदार होण्यास देखील मदत होईल. तसेच मधामध्ये दूध मिक्स करून लावणे देखील खूप फायदेशीर आहे. मात्र, दूध नेहमी कच्चे आणि ताजे असावे.

कॉफी आणि मधाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. 1 चमचे कॉफी आणि 1 चमचे मध आपल्याला लागेल. दोन्ही मिक्स करा आणि चेहऱ्यावर समान रीतीने लावा. 10 मिनिटे सोडा आणि नंतर आपले हात ओले करा आणि गोलाकार हालचालींनी चेहऱ्यावर मालिश सुरू करा. एक्सफोलिएशनच्या काही मिनिटांनंतर धुवा. मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात.

मध हे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक ब्लीच म्हणून ओळखले जाते. त्यात त्वचेचा रंगही हलका करण्याची क्षमता आहे. मधामध्ये कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त इत्यादींसारखी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेच्या पेशींचे पोषण करण्यास, त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

eight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..