
आपण प्रत्येक ऋतूत आपल्या आरोग्यासोबतच त्वचेचीही जास्त काळजी घेत असतो. त्याचबरोबर जर तुमची त्वचा अधिक तेलकट असेल तर त्यामुळे तुम्हाला मुरुमे आणि पुरळ यांसारख्या अनेक त्वचेच्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ लागते आणि त्वचेची चमकही कमी होते. त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी आता तुम्ही बाजारातील प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करावा. तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या तुळशीच्या पानांपासून ते कडुलिंबापर्यंतच्या काही नैसर्गिक गोष्टी तुमच्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारचे फेस पॅक तयार करू शकता.
जर त्वचा डागरहित असेल तर हे फेसपॅक चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते, परंतु यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कॅमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करणे आवश्यक नाही, तुम्ही घरी हे चार प्रकारचे हिरवे फेस पॅक बनवू शकता जे तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत ठेवतील.
कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. यासाठी प्रथम कडुलिंबाची पाने धुवा. नंतर ती बारीक करा आणि त्यात गुलाबजल टाकुन पेस्ट तयार करा. आता तयार फेसपॅक चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा.
तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे पुरळ आणि मुरुमांची समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे त्वचा मऊ आणि गुळगुळीत करतात. यासाठी तुळशीची पाने बारीक करा, नंतर त्यात दही मिक्स करून पेस्ट तयार करा आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. तुळशीचे आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म तुम्हाला डागमुक्त त्वचा देण्यास मदत करतात.
ग्रीन टीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेला आरामदायी आणि थंडावा देण्यास मदत करतात. हा फेस पॅक बनवण्यासाठी, ग्रीन टी मुलतानी मातीमध्ये मिक्स करा आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून चेहरा स्वच्छ धुवा.
काकडीत थंडावा देणारे गुणधर्म असतात आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात, तर कोरफडीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. हा फेस पॅक बनवण्यासाठी काकडीचा रसात कोरफड जेल मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. तर हा फेसपॅक त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास देखील मदत करतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)