AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेत सर्वात मोठा ट्विस्ट, फडणवीसांनी थेट एक अट ठेवल्याने मोठी खळबळ; काय घडणार?

अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण होणार होते, असे सांगितले जात आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठे भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेत सर्वात मोठा ट्विस्ट, फडणवीसांनी थेट एक अट ठेवल्याने मोठी खळबळ; काय घडणार?
devendra fadnavis and sharad pawar and ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 01, 2026 | 3:20 PM
Share

Devendra Fadnavis On NCP Merger : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाबाबत बोलते जात आहे. खासदार शरद पवार, आमदार जयंत पाटील या मोठ्या नेत्यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनकरण होणार होतं, असं सांगितलं आहे. विशेष म्हणजे या विलीनीकरणासाठी अनेक बैठका झाल्या होत्या, असाही दावा करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांनी मात्र बारामती येथे झालेली बैठक फक्त जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याबाबतच होती, असे सांगत शरद पवार यांचा दावा खोडून काढला आहे. असे असतानाच आता भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येत या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठं आणि महत्त्वाचं भाष्य केलं आहे. सोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर त्यासाठी एक अटही समोर ठेवली आहे.

फडणवीसांनी शरद पवार यांचा दावा खोडून काढला

देवेंद्र फडणवीस यांनी आज (1 फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली यावेळी पत्रकारांनी त्यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर प्रश्न विचारले. या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केल्या जाणाऱ्या विलीनीकरणाच्या दाव्याला एका प्रकारे खोडून काढले. अजित पवार आणि आम्ही खूप चर्चा करायचो. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची चर्चा होत असती तर अजितदादांनी आम्हाला त्याची कल्पना दिली असती. एकत्रीकरणाबाबत आम्हाला सांगितलं असतं, असं फडणवीस म्हणाले. तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्या पक्षाचे निर्णय तेच घेतात, असे सांगत अजितदादांच्या पक्षाच्या अस्तित्त्वावरही भाष्य केले.

फडणवीसांनी ठेवली एक अट

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण होणार तर त्यावर भाजपाची भूमिका काय असेल? याबात थेट भाष्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार असते तर आम्हाला त्यांबाबत सांगितले गेले असते. आता यापुढेही दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होत असेल तर त्याआधी आमच्याशी चर्चा करावी, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली.

नेमकं काय होणार?

दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं