AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांची शपथ घेऊन सांगतो… राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा खळबळजनक दावा; सगळं सांगून टाकलं!

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये एकत्रिकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे.

अजितदादांची शपथ घेऊन सांगतो... राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा खळबळजनक दावा; सगळं सांगून टाकलं!
Shashikan shinde and ajit pawarImage Credit source: Google
| Updated on: Feb 01, 2026 | 3:33 PM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 12 फेब्रवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते असा दावा अनेक नेत्यांनी केली आहे. तसेच याबाबत शरद पवार यांनीही अजित पवार आणि माझ्यात या विषयाची चर्चा झाली होती असं विधान केले आहे. जयंत पाटील यांनीदेखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी अनेक बैठका झाल्या होत्या अशी माहिती दिली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये एकत्रिकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं असं विधान करत या चर्चेवर शंका उपस्थित केली आहे. यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे.

मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रश्न विचारला असता शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘अजित दादांचं निधन झालं नसतं तर ही चर्चा झाली की नाही हे सांगायची वेळ आली नसती. आमची बाजू अशी दाखवली जाते की आम्हीच ही चर्चा सुरू केली आणि दादा गेले त्यांच्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मी अजित दादांची शपथ घेऊन सांगतो, माझं आणि त्यांचं भावनिक नातं आहे. त्यांची शपथ मी खोटी घेणार नाही. ही चर्चा 100 टक्के झाली होती, दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही दादांची इच्छा होती. अजितदादा आणि पवार साहेबांची भेट झाली होती, त्यानंतर दादांनी पवार साहेबांच्या उपस्थितीत हा निर्णय घ्यायचा आहे.’

दहा बारा वेळा बैठका झाल्या

पुढे बोलताना शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, ‘अजित दादांचे भविष्यकाळातील जे अंदाज होते, आराखडे होते यावर मी जास्त काही बोलणार नाही. मला वाटत की ज्यावेळी एखादा माणूस भाविनिकतेने बोलतो, मात्र तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या इच्छेसाठी आम्ही भूमिका मांडली, त्यानंतर आम्हालाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न होतो हे दुर्दैव आहे. विलीनीकरणाबाबत एकदा नाही दहा ते बारा वेळा बैठका झाल्या होत्या. तसं काही नसतं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आम्ही आमचे उमेदवार घड्याळ चिन्हावर कशाला उथे केले असते. ठरलं म्हणून केलं ना. महानगर पालिकांच्या निवडणुकीनंतर हा निर्णय होणार होता. मात्र लगेच जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली. मध्ये आठ दहा दिवसांचा वेळ मिळाला असता तर या चर्चेचा वेळ आला नसता. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर एकत्रि‍करणाचा निर्णय घ्यायचा हा निर्णय झाला होता.’

Follow Us
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना
तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा...
Harshwardhan Sapkal | तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा पवारांवर पुन्हा हल्लाबोल