Skin Care : बटाटा आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

| Updated on: Jun 30, 2021 | 8:19 AM

बटाटा खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे सर्वांनाच माहिती आहे पण बटाटा आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे

Skin Care : बटाटा आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : बटाटा खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे सर्वांनाच माहिती आहे पण बटाटा आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आपण घरच्या घरी बटाट्याचे फेसपॅक करून आपल्या चेहऱ्याला लावले तर चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला जास्त काही वेळ देखील लागत नाही. बटाटे हे जवळपास सर्वांचाच घरी असतात. (Potato and honey face pack is beneficial for the skin)

बटाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक बटाटा आणि चार चमचे मध घ्या. सर्वात अगोदर बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट मिक्स करून बारीक करून घ्या. हा फेसपॅक एक तासांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

तुम्हाला कोरड्या त्वचेची समस्या असेल तर बटाट्याचा वापर करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. यासाठी बटाटा किसून घ्या. आता किसलेल्या बटाट्यात दोन थेंब ग्लिसरीन, दोन थेंब गुलाबपाणी, अर्धा चमचा तांदळाचे पीठ, अर्धा चमचे मध सर्व टाकल्यानंतर ही पेस्ट व्यवस्थित मिसळून द्या. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा आणि नंतर सरळ पाण्याने चेहरा धुवा. आपण हा पॅक सतत 1 आठवड्यासाठी आपल्या त्वचेवर लावा आणि मग आपणास चेहऱ्यावर फरक जाणवेल.

2 कापसाचे गोळे, बटाटा रस, काकडीचा रस तयार घ्या. आपल्याला बटाट्याच्या रसामध्ये काकडीचा रस समान प्रमाणात मिसळावा लागेल आणि कापसाच्या सहाय्याने डॉर्क सर्कल्सवर लावावा लागेल. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटांनंतर धुवा. यामुळे डोळ्यांखालील डॉर्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावली पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Potato and honey face pack is beneficial for the skin)