मराठमोळी उद्योजिका… पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टने उभं केलं स्वत: चं ‘साम्राज्य’
Pratiksha Thorat Glamour Makeover Tuch Cosmetic Emire : पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टने उभं केलं 'साम्राज्य'... प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टने सुरु केला स्वत: चा नवा व्यवसाय... कसं आहे तिचं 'साम्राज्य'? कोण आहे ही मेकअप आर्टिस्ट? वाचा सविस्तर......
एखाद्या कंपनीमध्ये काम करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. रोजचं डेली रूटीन नकोसं वाटतं. अशा वेळ आपण एखादा स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, असा विचार अनेकांच्या मनात येतो. मात्र अनेकदा हे स्वप्न हे स्वप्नच राहतं. पण काहीजण धाडसाने पुढे येतात अन् स्वत: चा व्यवसाय सुरु करतात. त्यात आपला जम बसवतात. हे सगळं करणं सोपं नसलं तरी अशक्य अजिबात नाहीये. एका तरूणीने हे स्वप्न खरं करून दाखवलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक्षा थोरात हिने तिचा व्यवसाय उभा करत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.
प्रतिक्षाचं ‘साम्राज्य’
प्रतिक्षा थोरातने तिचं स्वत:चं ‘साम्राज्य’ उभं केलं आहे. अर्थात ‘प्रतिक्षा थोरात कॉस्मेटिक’ग्लॅमर टच अँड लेडीज शॉपी तिने सुरु केली आहे. यात तुम्हाला लागणारं मेकअपचं साहित्य होलसेल आणि रिटेल दरात मिळणार आहे. शिवाय साड्या, ड्रेसेस आणि शू हाऊस देखील इथे आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत. तिच्या या नव्या व्यवसायासाठी अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. या यशासाठी तिचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
View this post on Instagram
कोण आहे प्रतिक्षा थोरात ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. सोशल मीडियावर प्रतिक्षा प्रचंड चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 11 लाख फॉलोव्हर्स आहेत. सामान्य घरातील मुलगी ते प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट असा तिचा प्रवास राहिला आहे. प्रतिक्षा मेकअप कसा करावा याचे क्लासेस घेते. महाराष्ट्रभरातून मुली तिच्याकडे शिकायला येतात. या शिवाय तिने तिचा ब्युटी ब्रँडही सुरु केला आहे. प्रतिक्षा थोरात नावाने ब्युटी प्रोडक्ट ब्रँड तिने लॉन्च केला आहे. हा सगळा व्यवसाय तिने एका छताखाली आणलं आहे. तिच्या या नव्या सुरूवातीसाठी अनेकांनी सदिच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
प्रतिक्षावर शुभेच्छांचा वर्षाव
प्रतिक्षा थोरातने नवा व्यवसाय सुरु केला आहे. याबाबतची पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे. अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ताई आज तुझ्या साठी माझ्या डोळ्यातुन आनंदाचे अश्रू येतायत… तू लय लय भारी आहेस….तुला सात आठ वर्षांपासून बघत आलोय… तू खुप जिद्दी आहेस खुप कष्ट करतेस तुला बघून खुप प्रचंड प्रेरणा भेटते… एवढं यश मिळवून पण तु जमीनीवर आहेस, अशी कमेंट तिच्या चाहतीने केली आहे.