त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी चंदनाचे ‘हे’ 3 फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा !

| Updated on: Jun 20, 2021 | 1:16 PM

या हंगामात त्वचेची विशेष काळजी ही घ्यावी लागेत. रासायनिक उत्पादने वापरल्याने त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. जर आपल्याला घरगुती उपचारांचा अवलंब करायचा असेल तर आपण चंदन वापरू शकता.

त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी चंदनाचे हे 3 फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा !
चंदन
Follow us on

मुंबई : या हंगामात त्वचेची विशेष काळजी ही घ्यावी लागते. रासायनिक उत्पादने वापरल्याने त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. जर आपल्याला घरगुती उपचारांचा अवलंब करायचा असेल तर आपण चंदन वापरू शकता. चंदनमध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय आयुर्वेदातही चंदनचा वापर केला जातो. (These 3 face packs of sandalwood are extremely beneficial for the skin)

1. त्वचा क्लीन्सर

साहित्य-

3 चमचा चंदन पावडर

2 चमचा दूध

प्रक्रिया :

या दोन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि पेस्ट तयार करा. चेहरा आणि मानेवर ही पेस्ट लावा. पेस्ट कोरडी झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

2. सुंदर त्वचा :

साहित्य-

2 चमचा चंदन पावडर

अर्धा चमचा हळद

1 चमचा कोरफड जेल

प्रक्रिया :

मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी या तिन्ही गोष्टी एकत्र करून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरूमावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे तसेच ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

3. अँटी एजिंग मास्क

साहित्य-

3 चमचा चंदन पावडर

2 चमचा संत्र्याचा रस

1 चमचा नारळ तेल

प्रक्रिया :

या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट 20 मिनिटे ठेवा आणि नंतर आपला चेहरा धुवा. वृद्धत्वाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून दोनदा हा फेस मास्क लावा.

फेसपॅक

आंब्याचा फेसपॅक आपण चेहऱ्याला लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. एक आंबा घ्या आणि त्याचा लगदा काढा, दूध, गुलाबपाणी, चंदन पावडर त्यामध्ये मिक्स करा आणि बारीक पेस्ट करून घ्या. हा फेसपॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेला देखील लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे हा पॅक आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर आपला चेहऱ्या कोमट पाण्याने धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा, मुरूमाची डाग, पिपल्स आणि सुरकुत्या जाण्यास मदत होते.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(These 3 face packs of sandalwood are extremely beneficial for the skin)