AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर, वाचा सविस्तर!

त्वचेवरील काळ्या डागांमुळे आपली त्वचा निस्तेज दिसते. त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी बाजारामध्ये बऱ्याच क्रिम उपलब्ध आहेत. मात्र, म्हणावा तसा त्याचा उपयोग होत नाही. त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे काळ्या डागांची समस्या दूर होईल.

Beauty Tips : चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय फायदेशीर, वाचा सविस्तर!
त्वचा
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 1:08 PM
Share

मुंबई : त्वचेवरील काळ्या डागांमुळे आपली त्वचा निस्तेज दिसते. त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी बाजारामध्ये बऱ्याच क्रिम उपलब्ध आहेत. मात्र, म्हणावा तसा त्याचा उपयोग होत नाही. त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे काळ्या डागांची समस्या दूर होईल. विशेष म्हणजे हे घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ सुध्दा लागत नाही.

-तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपण स्वतःला हायड्रेट ठेवले पाहिजे. शरीराला हायड्रेट ठेवल्याने चेहरा हायड्रेट राहतो. यासाठी भरपूर पाणी प्यावे. जेव्हा शरीरात निर्जलीकरण होत नाही तेव्हा चेहरा नेहमी तेजस्वी दिसतो.

-चेहऱ्यावरील डाग दूर करण्याचा आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे 6-7 तुळशीची पाने मधात मिसळा. या दोघांचे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यालवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.

-जर आपल्याला चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असतील तर कोरफड जेल लावा. कोरफडच्या जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे त्वचेचे डाग वेगाने कमी करतात. आपण ते थेट कोरफडचा गर काढून देखील आपल्या चेहऱ्याला लावू शकतो. या व्यतिरिक्त कोरफडचे जेल देखील बाजारात उपलब्ध आहे.

-चेहऱ्यावरील दागांपासून मुक्ती मिळवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे टोमॅटोचा रस. रात्री झोपताना टोमॅटोचा रस आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर सकाळी उठून आपला चेहरा धुवा. हा उपाय आपण सतत आठ दिवस केला तर आपल्याला चांगला परिणाम दिसेल.

-जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी मुलतानी माती वापर करू शकता. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. यासाठी दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर मुलतानी माती लावा. यामुळे काळे डाग दूर होतील.

-पपई हे एक नैसर्गिक एक्सफोलीएट आहे जे अँटी-एजिंगचे काम करते. एक्सफोलीएटिंग प्रक्रिया आपली मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते. एक्सफोलिएशनसाठी कच्चा पपई एका भांड्यात स्मॅश करून घ्या आणि हा कुस्करलेला गर चेहऱ्यावर मास्क म्हणून लावा. हा पपईचा फेस मास्क वाळवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(This home remedy is beneficial for removing blemishes on the face)

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...