सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी टोनर अत्यंत फायदेशीर, टोनर वापरण्याची पद्धत जाणून घ्या!

| Updated on: Mar 30, 2022 | 12:55 PM

त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जात आहे. त्यापैकी एक प्रमुख म्हणजेच टोनर आहे. दिवसातून किमान दोनदा ते चेहऱ्यावर लावणे फायदेशीर मानले जाते. त्वचेच्या प्रकारानुसार बाजारात उपलब्ध असलेले टोनर (Toner)  चमकदार त्वचा मिळण्यास मदत करतात.

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी टोनर अत्यंत फायदेशीर, टोनर वापरण्याची पद्धत जाणून घ्या!
टोनर वापरणे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जात आहे. त्यापैकी एक प्रमुख म्हणजेच टोनर आहे. दिवसातून किमान दोनदा ते चेहऱ्यावर लावणे फायदेशीर मानले जाते. त्वचेच्या प्रकारानुसार बाजारात उपलब्ध असलेले टोनर (Toner)  चमकदार त्वचा मिळण्यास मदत करतात. टोनरच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर त्याचा नियमित वापर केल्याने त्वचेवरील पिंपल्स (Pimples) जाण्यास मदत होते. असे म्हटले जाते की टोनर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगले असते. परंतु तेलकट त्वचा असलेल्यांना याची सर्वात जास्त गरज आहे.

चेहरा धुतल्यानंतर- चेहरा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी तो स्वच्छ केला पाहिजे. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुणे चांगले. त्याचवेळी जर तुम्ही त्वचेवर टोनर लावलात तर त्यापूर्वी तुम्ही तुमचे तोंड धुवावे.

त्वचेचे प्रकार- चेहऱ्यावर कोणतेही सौंदर्य उत्पादने लावण्यापूर्वी ते तुमच्या त्वचेनुसार निवडणे आवश्यक मानले जाते. मात्र, त्वचा कोरडी असो वा तेलकट, हायड्रेटिंग टोनर असणे उत्तम मानले जाते. यामुळे त्वचा मॉइश्चरायझेशन राहते.

सीरम वापरा-  त्वचेच्या काळजीमध्ये सहज उपलब्ध सीरम समाविष्ट करण्याचा ट्रेंड बनला आहे. चेहऱ्यावर टोनर लावल्यानंतर चेहऱ्यावर सीरम नक्कीच लावावे. जर तुम्ही रात्रीच्या वेळी या टीपचे पालन केले तर ते अधिक फायदेशीर होईल.

खाज सुटणे-  जर तुम्हाला चेहऱ्यावर खाज सुटत असेल किंवा ती जाणवत असेल तर अशा स्थितीत टोनरचा जास्त वापर टाळा. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत दिवसातून एकदाच त्वचेवर टोनर लावावा.

चेहरा पाण्याने धुवा- सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर चेहरा धुणे अधिक फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावर टॅन जमा होत नाही. थंड आणि स्वच्छ पाण्याने शक्य तितक्या वेळ आपला चेहरा धुण्याचा प्रयत्न करा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Health Care : जाणून घ्या लवंगचे जबरदस्त फायदे आणि अधिक सेवन करण्याचे तोटे!

Health Care Tips : उन्हाळ्यात या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा आणि निरोगी राहा!