Health Care Tips : उन्हाळ्यात या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा आणि निरोगी राहा!

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर मानला जातो. म्हणूनच सकाळी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. ते तुमची ऊर्जा पातळी राखण्यासाठी काम करते. तुम्ही तळलेले आणि अस्वास्थ्यकर अन्नाऐवजी (Food) काही आरोग्यदायी पर्याय निवडू शकता जे ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करतात.

Health Care Tips : उन्हाळ्यात या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा आणि निरोगी राहा!
निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 9:49 AM

मुंबई : सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर मानला जातो. म्हणूनच सकाळी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. ते तुमची ऊर्जा पातळी राखण्यासाठी काम करते. तुम्ही तळलेले आणि अस्वास्थ्यकर अन्नाऐवजी (Food) काही आरोग्यदायी पर्याय निवडू शकता जे ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि चयापचय गतिमान करण्यास मदत करतात. तुम्ही पपई, भिजवलेले बदाम आणि भाज्यांचे रस इत्यादी अनेक गोष्टी सकाळी नाश्त्यात (Breakfast) घेऊ शकता. हे वजन कमी करण्यास देखील मदत करतील. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही नाश्त्यात रिकाम्या पोटी घ्यावेत.

या 5 आरोग्यदायी पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा!

पपई सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. यामुळेच आपण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा नक्कीच समावेश करायला हवा.

कलिंगड उन्हाळ्यात दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी शरीराला भरपूर इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, लाइकोपीन आणि फ्रक्टोज मुबलक प्रमाणात असते. त्यात कॅलरीज खूप कमी असतात. कलिंगड रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. यामुळे कलिंगड सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या.

भिजवलेले बदाम सकाळी मूठभर भिजवलेले बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. व्यायाम किंवा जिम करणारे लोक जास्त करून भिजवलेले बदाम खातात. मात्र, सर्वांनीच सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेल्या बदामाचा समावेश करायला हवा. बदाम, अक्रोड आणि अंजीरमध्ये भरपूर प्रथिने असतात. हे शरीराला ऊर्जावान ठेवण्याचे काम करते.

जिऱ्याचे पाणी रिकाम्या पोटी जिरे पाणी आणि ओवा पाणी यांसारखा पाचक पेय घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात खनिजे, एंजाइम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. हे चयापचय सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

भाज्यांचे रस तुम्ही गाजर, बीट आणि हिरव्या भाज्यांपासून बनवलेला रस सकाळी पिऊ शकता. विशेष म्हणजे हिरव्या भाज्यांचा ज्यूस सकाळी नाश्त्यामध्ये पिणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. या ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबरने मोठ्या प्रमाणात आढळते. हे ज्यूस पचनसंस्था, त्वचा आणि केस निरोगी ठेवतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss : ‘या’ फळांमुळे उन्हाळ्यात वजन कमी होण्यास मदत होईल, वाचा सविस्तर!

आयुर्वेदानुसार त्वचा आणि केसांची अशा प्रकारे काळजी घ्या आणि समस्या दूर करा!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.