AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात गोड फळ तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरतो फायदेशीर

Benefits of Figs : अंजीर हे अतिशय गोड फळ असले तरी त्याचा मधुमेहाच्या रुग्णांवर विपरीत परिणाम होत नाही. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी अंजीरचा उपयोग होतो, अंजीर या फळापासून अनेक आरोग्याचे फायदे होतात. अंजीर खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घ्या.

जगातील सर्वात गोड फळ तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरतो फायदेशीर
shailesh musale
shailesh musale | Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 6:46 PM
Share

Benefits of Anjir : गोड फळे खाण्यासाठी सगळ्यांनाच आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, जगातील सर्वात गोड फळांच्या यादीत अंजीरचा देखील समावेश आहे. अंजीर हे गोड असले तरी ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. अंजीर खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. अंजीरमध्ये फायबर, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. अंजीरमध्ये अनेक महत्त्वाचे घटक आढळतात. गोड असूनदेखील ते मधुमेह दूर करण्यास मदत करतात. अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, म्हणजेच ते खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढत नाही.

आपल्या शरीराला उर्जा हवी असेल तर आपल्याला ग्लुकोजची आवश्यकता असते. पण जेव्हा याचेच प्रणाण वाढू लागते. तेव्हा मधुमेहासारखे आजार होतात. त्यामुळे मधुमेहामध्ये रक्तातील ग्लुकोज कमी ठेवण्यासाठी अंजीर खावे. अंजीर हे पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. अंजीरच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज काढून टाकण्याची क्षमता अंजीरमध्ये असते.

अंजीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो

अंजीर हे फळ म्हणून खाल्ले तर त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. ताज्या अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 51 आणि वाळलेल्या अंजीरांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 61 असतो. हे कमी ते मध्यम GI श्रेणीत येते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ग्लुकोजची पातळी वाढत नाही.

पोटाच्या आजारांचा शत्रू

जर पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असतील तर अंजीर खालले पाहिजे. पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या असतील तर त्यांनी अंजीर खालले पाहिजे. अंजीरमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे साखरेचे चयापचय मंदावते. अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

अंजीर पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे

अंजीर जर तुम्ही पाण्यात भिजवून खालले तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा मिळू शकतो. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे अंजीर अतिशय मऊ बनते जे सहज पचवता येते. अंजीर खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषण मिळते.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?